मुंबई - kranti redkar Aayushi Bhaveनवरात्र म्हणजे रंग, संगीत, ताल आणि गरब्याच्या ठेक्यावर थिरकण्याचा उत्सव! याच उत्सवी वातावरणाची रंगत वाढवणारं ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातील ‘निघाली राधा सोडूनी गोकुळा’ हे नवं गरबागीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या गाण्यात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांची खास नृत्य अदाकारी पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी वातावरण, ताल धरायला लावणारं संगीत, आकर्षक नृत्य आणि उत्साहाने भरलेला फेस्टिव्ह मूड यामुळे हे गाणं नवरात्रीच्या जल्लोषात रंग भरणार आहे. दरम्यान, ‘मैत्रेया’च्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट आता २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओंकार मंगेश यांनी लिहिलेल्या या गाण्याला पंकज पडघण यांनी संगीत दिलं असून आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध झालं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि ठेका यांचा सुंदर मेळ साधत त्यात पारंपरिक गरब्याची झलक आणि आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश अंदाज पाहायला मिळतो. गाण्यातील रंगांची उधळण आणि कलाकारांच्या उत्साही नृत्यामुळे त्याचा फेस्टिव्ह वाईब आणखी खुलत असून सुजित कुमार यांच्या कोरिओग्राफीने गाण्यातील गरब्याच्या तालाला अधिकच आकर्षक रूप दिलं आहे. नवरात्रीच्या दिवसांत मित्रमैत्रिणींसोबत गरबा खेळण्याची तयारी करणाऱ्या तरुणाईला हे गाणं नक्कीच आपलंसं वाटेल.kranti redkar Aayushi Bhave
दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “नवरात्र हा रंग आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे ‘मैत्रेया’च्या या गाण्यात तोच उत्साह अगदी मनापासून दिसावा, अशी आमची इच्छा होती. गाण्याचे शब्द, संगीत आणि कलाकारांचा उत्साह यामुळे एक सुंदर फेस्टिव्ह वातावरण तयार झालं आहे. सुजित कुमार यांनी केलेली कोरिओग्राफी खूप एनर्जेटिक आहे. नवरात्रीत हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, अशी आशा आहे. त्याचबरोबर आता ‘मैत्रेया’च्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर झाली असून २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या उत्सवी गाण्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही उत्सुकता वाढली आहे.”kranti redkar Aayushi Bhave
संगीतकार पंकज पडघण म्हणतात, “गरब्याचं गाणं करताना त्यात उत्सवाचा मूड आणि नृत्याला पूरक असा ठेका असणं खूप महत्त्वाचं होतं. ओंकार मंगेश यांनी लिहिलेले शब्द आणि आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. संगीतामध्ये पारंपरिक गरब्याचा फील ठेवतानाच आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश आणि एनर्जेटिक साउंड देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांचा उत्साही परफॉर्मन्स आणि सुजित कुमार यांची कोरिओग्राफी यामुळे गाणं आणखी खुललं आहे.”kranti redkar Aayushi Bhave
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “नवरात्रीच्या उत्सवात प्रेक्षकांना आनंद देणारं आणि ऐकताच नाचावंसं वाटणारं गाणं ‘मैत्रेया’मध्ये असावं, अशी आमची इच्छा होती. गाण्याचं संगीत, शब्द, नृत्य आणि रंगीबेरंगी मांडणी यांचा सुंदर मेळ साधला आहे. सगळे कलाकार एकत्र गरबा करताना दिसत असल्याने गाण्याला एक वेगळीच एनर्जी मिळाली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने हे गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, याचा आनंद आहे. तरुणाईपासून कुटुंबापर्यंत सगळ्यांना हे गाणं आवडेल, असा विश्वास आहे.”kranti redkar Aayushi Bhave
समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले असून मनोज खळतकर निर्माते आहेत, तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.kranti redkar Aayushi Bhave