नवी मुंबईत बजरंग दलाचा दणका... रबाळे MIDCमध्ये अनधिकृत भोंग्यांवरून वाद! आंदोलनाचा इशारा मिळताच मशिदीवरील भोंगे उतरवले

    07-Oct-2026
Illegal Loudspeaker at Mosque
 
ठाणे (Illegal Loudspeaker at Mosque) : रबाळे MIDC येथील गौतम नगर परिसरातील गौसिया मस्जिदीवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यविरोधात स्थानिक हिंदू रहिवासी वेळोवेळी तक्रार करत होते..मात्र स्थानिक प्रशासन आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने भोंग्यातून येणाऱ्या कर्कश्य आवाजांनी स्थानिक अक्षरशः हैराण झाले होते..या भागात मुस्लिमांची वस्ती आहे तरी हिंदू वस्तीही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वास्तव्यास आहे.. महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असूनही पोलीस आणि प्रशासन भोंग्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्थानिक हिंदूंनी बजरंग दलकडे धाव घेतली..तात्काळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रबाळे MIDC पोलिस ठाण्यात यबाबत तक्रार दाखल केली. भोंग्यांमधून होणाऱ्या अजानच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
 
बजरंग दल नवी मुंबईचे जिल्हा सहसंयोजक तेजस यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली प्रखंड संयोजक निखिल घुडे, रबाळे प्रखंडचे अर्जुन सिंह यांच्यासह सुमारे ७० ते ८० कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तातडीने कारवाईची मागणी केली.इतके दिवस यबाबत दुर्लक्ष का करण्यात आले असा जाब विचारत तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलाचे नवी मुंबई सह संयोजक तेजस पाटील यांनी दिला. (Illegal Loudspeaker at Mosque)
 
बजरंग दलाच्या आक्रमक पावित्र्याने पोलीस ऍक्टिव्ह मोड वर आले आणि तक्रार दाखल केल्यानंतर सुमारे दोन तासांत पोलिस प्रशासनाने कारवाई करत मस्जिदीवरील भोंगे उतरवले... त्यामुळे या कारवाईची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. (Illegal Loudspeaker at Mosque)
 
 




संबंधित मजकूर