अवैध बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाईला वेग; जम्मू-काश्मीरमधून १५० जणांचे निष्कासन

    07-Oct-2026   
 
Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir
 
मुंबई (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir) : भारतामधून अवैध बांगलादेशी घुसखोरांना परत पाठविण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर प्रशासनाने अवैधरित्या राहत असलेल्या १५० बांगलादेशी नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने श्रीनगरहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे पाठवून सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील ही कारवाई विदेशी नागरिक कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.
 
या नागरिकांची ओळख मजुरांच्या पडताळणीदरम्यान तसेच आधार कार्डच्या डेटामध्ये आढळलेल्या अनियमिततेनंतर करण्यात आली. प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आणखी १५० बांगलादेशी नागरिकांच्या एका गटाला ७ ऑक्टोबर रोजी परत पाठवण्यात आले. अशा प्रकारे दोन टप्प्यांत एकूण ३०० लोकांना परत पाठवले जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईवरून वैध कागदपत्रांशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या अशा नागरिकांविरोधात भविष्यातही कारवाई सुरू राहण्याचे संकेत मिळताना दिसतायत. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या, निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नवलकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने १० ते १२ ऑगस्टदरम्यान जम्मूचा दौरा केला होता. या पथकाने लोकसंख्येतील बदल आणि अवैध स्थलांतरितांच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. प्रशासनाने रैका वन क्षेत्रातील रहीमनगर येथे वनजमिनीवर उभारलेल्या अवैध झोपड्या आणि इतर बांधकामांवरही कारवाई केली होती.
 
सरकारी अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ७,६५६ बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी ६,७३७ जण केवळ जम्मू विभागात आहेत. नरवाल आणि बर्मा मार्केटसारख्या भागांमध्येही प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर स्थानिक पातळीवर अवैध बांधकामे हटवण्याची कारवाई केली जात आहे. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
या अवैध स्थलांतरितांना एखाद्या विशिष्ट योजनेअंतर्गत वसवण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेसमोर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सीमावर्ती प्रदेश असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने आव्हान ठरू शकतात.
 
या अवैध स्थलांतरितांकडे वैध कागदपत्रे नसल्यामुळे प्रशासनाकडेही त्यांची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. अनेक वर्षांपासून येथे राहत असल्याने हे लोक स्थानिक समाजात मिसळले आहेत. रोहिंग्यांच्या अनेक वस्त्यांमध्ये वीज आणि पाण्याचे जोडणीसुद्धा घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
पश्चिम बंगालमधून निष्कासन
 
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या मोहिमेअंतर्गत सुमारे ४,८०० हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. राज्यातील विविध होल्डिंग सेंटरमध्ये आणखी ८०० हून अधिक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्यांच्या निष्कासनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात कडक देखरेख आणि ‘स्टेट इनफिल्ट्रेशन रजिस्टर’सारख्या उपाययोजनांनंतर १,६०० हून अधिक असे बांगलादेशी नागरिक, जे अनेक वर्षांपासून अवैधरित्या राहत होते, त्यांनी स्वतःहून हकीमपूर चेक पोस्टमार्गे बांगलादेशात परतल्याचे सांगण्यात आले आहे. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
आसाममधून निष्कासन
 
आसाम विधानसभेत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २,०८९ अवैध परदेशी नागरिकांना राज्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी २,०२३ जण बांगलादेशातील होते. आसाममधील श्रीभूमीसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून घुसखोरांना परत पाठवण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले होते की, सीमेवरील कडक पहाऱ्यामुळे २१ अवैध स्थलांतरितांना मध्यरात्रीच त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
बांगलादेशच्या संसदेत अवैध स्थलांतरितांच्या परतीबाबत चिंता
 
बांगलादेशचे खासदार अख्तर हुसेन यांनी असे वक्तव्य केले होते की, भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास मोठ्या प्रमाणावर अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना मायदेशी परत जावे लागू शकते. मे २०२६ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी, एक्झिट पोल आणि निवडणुकीच्या कलादरम्यान बांगलादेशच्या संसदेत बोलताना नॅशनल सिटिझन पार्टीचे खासदार अख्तर हुसेन यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, बंगालमध्ये भाजपचा विजय झाल्यास बांगलादेशसमोर मोठे निर्वासित संकट निर्माण होऊ शकते, कारण भाजपचे धोरण अवैध घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे आहे. अख्तर हुसेन यांनी बांगलादेश सरकारला या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मते, भाजप सत्तेत आल्यानंतर घुसखोरीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करेल आणि अवैधरित्या भारतात राहणाऱ्या लोकांना बांगलादेशात परत पाठवले जाऊ शकते. या वक्तव्यावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राजकीय फायद्यासाठी या अवैध स्थलांतरितांना जाणीवपूर्वक राज्यात आश्रय दिल्याचा दावा या करण्यात आला आहे. (Bangladesh Illegal Immigrants Jammu Kashmir)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर