मुंबई (Maya Bhatkar India Book of Records) : गेल्या २७ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर आपल्या लेखणीतून आवाज उठवणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया हेमंत भाटकर यांच्या नावावर एक नवा आणि दुर्मिळ विक्रम नोंदवला गेला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहिलेल्या तब्बल ६ हजार १३६वाचकपत्रांची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स’ने (India Book of Records) त्यांची अधिकृत नोंद केली आहे.
१९७६ च्या सत्याग्रहापासून आपल्या कार्याची सुरुवात करणाऱ्या भाटकर यांनी १९८० मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम केले. १९८२ पर्यंत त्यांनी ग्रामीण भागात विविध ग्रामविकास प्रकल्पांत सक्रिय सहभाग नोंदवला. (Maya Bhatkar India Book of Records)
त्यानंतर १९९७ ते २००५ या काळात त्यांनी ‘केशव सृष्टी’ प्रकल्पाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला असून, २००५ ते २०१० दरम्यान त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या आणि व्यवस्थापन परिषद सदस्य (Management Council Member) म्हणून जबाबदारी सांभाळली. सध्या २०१५ पासून त्या जनकल्याण सहकारी बँक, मुंबई येथे संचालिका म्हणून कार्यरत आहेत.विविध संस्थात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी आपल्या वाचकपत्रांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पत्रांनी नेहमीच महिलांचे हक्क, सामाजिक अनिष्ट प्रथा आणि नागरी प्रश्नांवर रोखठोक भाष्य केले आहे. (Maya Bhatkar India Book of Records)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.