भजनसम्राट प्रमोद हर्यान यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा वाढदिवस

सात वर्षांपासून वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा; वृद्धाश्रमात अन्नदान, ब्लँकेट व फळवाटप

    06-Oct-2026
Pramod Haryan Birthday
 
मुंबई (Pramod Haryan Birthday) : महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा प्रमोद हर्यान यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत महालक्ष्मी येथील वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला.  गेल्या सात वर्षांपासून 'हर्यान बुवा शिष्य' परिवाराच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून, अन्नदान, ब्लँकेट व फळवाटप तसेच सामूहिक भजनगायन करण्यात आले. (Pramod Haryan Birthday)
 
वाढदिवसाच्या निमित्ताने 'हर्यान बुवा शिष्य' परिवाराने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आपुलकीने संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या मनातील भावना जाणून घेत त्यांना प्रेमाचा आधार देण्याचा प्रयत्न केला. अनेक शिष्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांमुळे वृद्धाश्रमात भक्तिमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. (Pramod Haryan Birthday)
 
यावेळी बोलताना प्रमोद हर्यान बुवा म्हणाले, “वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, आपल्या आनंदात समाजातील इतरांना सहभागी करून घेण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात कुटुंब, समाज आणि संस्कृतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात वाढदिवस साजरा करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. आज या आजी-आजोबांकडून मिळालेले प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकी माझ्यासाठी कोणत्याही भेटवस्तूपेक्षा अनमोल आहे.
 
गेल्या सात वर्षांपासून माझ्या वाढदिवसानिमित्त शिष्य परिवाराच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. भजन ही केवळ मनोरंजनाची किंवा अध्यात्माची साधना नसून, त्यातून माणसांना जोडण्याची आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करण्याची मोठी शक्ती आहे. त्यामुळे भजन, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत गरजू, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्याचा आमचा संकल्प आहे.” (Pramod Haryan Birthday)
 
कार्यक्रमानंतर वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना ब्लँकेट व फळांचे वाटप करण्यात आले. त्यांच्याशी हितगुज साधून, प्रेमाने संवाद साधत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
 
यावेळी हर्यान बुवा शिष्य परिवाराचे अध्यक्ष बाबाजी कानडे, सचिव संतोष टक्के, नाना शिरसाठ,  कावले आबा सावंत, सदानंद सुर्वे, तुळशीदास टक्के, मधुकर बणे यांच्यासह हर्यान बुवा शिष्य परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. 
 
हर्यान बुवा यांच्या अनेक शिष्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. ज्येष्ठ नागरिक आणि शिष्य परिवाराच्या सदस्यांनी एकत्रितपणे भजनाचा आनंद घेतल्याने संपूर्ण वातावरण भावनिक आणि भक्तिमय झाले. (Pramod Haryan Birthday)




संबंधित मजकूर