एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर निश्चितच प्रयत्न करीन! आमदार कालिदास कोळंबकर यांचा कामगारांना दिलासा!

    06-Oct-2026

NTC Mill Workers       
 
मुंबई (NTC Mill Workers): राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने बारा महिन्याच्या पगाराची प्रमुख मागणी पुढे ठेवून अन्य मागण्यांसाठी ७ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मुंबईतील बंद चार गिरण्यांपैकी दादरच्या दादासाहेब फाळके रोडवरील टाटा मिलच्या उपोषणकर्त्या कामगारांची विभागीय आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज भेट घेऊन, एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्न सोडवनुकीला सर्वतोपरी सहकार्य करीन,असा दिलासा व्यक्त केला आहे.त्याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई आणि संघटन सेक्रेटरी दीपक राणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांच्या साखळी उपोषणाचा आजचा २९ वा दिवस आहे. 
 
दरम्यान कामगार नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिल्ली केंद्र सरकारला, कामगारांचे जटिल प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी केली आहे.
 
आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रसंगी मिल मधील वरिष्ठ अधिका ऱ्यांना घेराव घाल ण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.एनटीसीच्या बेलार्ड पिअरवर येथील प्रधान कार्यालयावर कामगारांचा मोर्चा काढण्यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल,असेही सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीसांगितले.उपोषणाला विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. (NTC Mill Workers)
 
एनटीसी कामगारांचा ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ पर्यंतचा बाकी पगार मिळालाच पाहिजे,सन २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटी मिळालीच पाहिजे, कामगार व कर्मचाऱ्यांना मिळणारी कायदेशीर देणी मिळालीच पाहिजे,मिलच्या बाहेर असलेल्या कामगारांना जून २०२२ पर्यंत पूर्ण पगार व जुलै २०२३ नंतर ५० टक्के पगार देण्यात आलाच पाहिजे,अशा आंदोलना प्रसंगी कामगारांनी मागण्या केल्या आहेत. (NTC Mill Workers)
 
 




संबंधित मजकूर