पुण्यात गोड्या पाण्यातील माशांमध्ये मायक्रोप्लास्टिक; अन्न साखळीतील गंभीर समस्येवर संशोधनाचा प्रकाश

    06-Oct-2026
 
 
Microplastic pollution
 
पुणे: प्लास्टिक प्रदूषण आता केवळ सागरी परिसंस्थेपुरते मर्यादित राहिलेले नाही. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथील पीएच.डी. (PhD) संशोधनात शहरात सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या गोड्या पाण्यातील माशांमध्ये मोठया प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. गोड्या पाण्यातील परिसंस्थेतून प्लास्टिक प्रदूषण कसे प्रवास करते आणि ते अन्नसाखळीत कसे प्रवेश करते, हे समजून घेण्याची मोठी गरज या अभ्यासाने समोर आणली आहे. (Microplastic pollution)
 
हे संशोधन एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या एन्व्हायर्नमेंटल स्टडीज (पर्यावरण शास्त्र) विभागाच्या पीएच.डी. संशोधक सिमरन सिंग या डॉ. सोमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. 'एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सीड ग्रँट' अंतर्गत या संशोधनाला निधी मिळाला आहे. गोड्या पाण्यातील मायक्रोप्लास्टिकच्या प्रदूषणाची उपस्थिती, त्याचे वैशिष्ट्य, संभाव्य स्त्रोत आणि मानवी आरोग्यावर व गोड्या पाण्यातील परिसंस्थेवर होणारे परिणाम तपासण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या रोहू (Rohu) आणि तिलापिया (Tilapia) या माशांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. (Microplastic pollution)
 
संशोधनाची सुरुवात पुण्याच्या गोड्या पाण्यातील माशांच्या पुरवठा साखळीच्या (Supply Chain) सविस्तर मॅपिंगने झाली. केवळ किरकोळ बाजारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, संशोधकांनी शहरातील प्रमुख घाऊक व्यापारी (Wholesalers) आणि वितरकांचे सर्वेक्षण केले, जे शहरात मासे येण्याचे मुख्य मार्ग ठरतात. या सर्वेक्षणासाठी पुण्याची चार भौगोलिक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली होती, ज्याद्वारे शहरातील संपूर्ण प्रमुख वितरण जाळे व्यापले गेले. (Microplastic pollution)
 
संशोधकांनी पुण्यातील २६ घाऊक व्यापारी आणि वितरकांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वेक्षणाच्या आधारे, अभ्यासाने असा अंदाज लावला आहे की दररोज सुमारे ३७ ते ४० टन गोड्या पाण्यातील मासे पुण्याच्या बाजारात प्रवेश करतात, ज्यामध्ये रोहू आणि तिलापिया या सर्वाधिक व्यापार होणाऱ्या प्रजाती आहेत. या पुरवठ्याचा मोठा हिस्सा मत्स्यपालन (Aquaculture) पद्धतींमधून येतो, तर आंध्र प्रदेश, गुजरात, रत्नागिरी, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या विविध राज्यांतून व प्रदेशांतूनही मासे पुण्यात आणले जातात. हे पुण्याच्या गोड्या पाण्यातील माशांच्या पुरवठा साखळीचे आंतरराज्यीय आणि व्यापक स्वरूप दर्शवते. (Microplastic pollution)
 
प्रयोगशाळेतील सखोल तपासणीदरम्यान नमुन्यांमधील गोड्या पाण्यातील माशांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले. यात फायबर्स (fibres), फ्रॅगमेंट (fragments) आणि पेलेट्स (pellets) चे कण ओळखले गेले, जे गोड्या पाण्यातील वातावरणात आढळणारे मायक्रोप्लास्टिकचे सामान्य स्वरूप मानले जातात. आढळलेले प्रमाण आणि स्थानिक वापर पद्धतींनुसार, अभ्यासाने असा अंदाज व्यक्त केला आहे की जर एखाद्या व्यक्तीने ५० वर्षांच्या कालावधीत आठवड्यातून दोनदा सरासरी २५० ग्रॅम गोड्या पाण्यातील मासे खाल्ले, तर तो संभाव्यतः ९३,६०० ते १,२४,८०० मायक्रोप्लास्टिकचे कण शरीरात घेऊ शकतो. (Microplastic pollution)
 
तथापि, या कणांच्या संख्येची थेट तुलना प्लास्टिकच्या बाटल्या किंवा इतर प्लास्टिकच्या वस्तूंशी केली जाऊ शकत नाही, असे संशोधकांनी आवर्जून स्पष्ट केले आहे. कारण त्याचे वजन आणि आरोग्यावरील संभाव्य परिणाम हे कणांचा आकार, पॉलिमरची रचना आणि संबंधित प्रदूषक यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात. सध्या सुरू असलेल्या या डॉक्टरल संशोधनाचा भाग म्हणून तपशीलवार परिणामांचे विश्लेषण आणि पॉलिमरचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. (Microplastic pollution)
 
मायक्रोप्लास्टिक हे प्लास्टिकमधील विविध रसायने आणि सभोवतालच्या पर्यावरणातील प्रदूषकांसह अनेक रासायनिक व जैविक घटकांना वाहून नेऊ शकते किंवा त्यांच्याशी प्रक्रिया करू शकते. दीर्घकालीन आहारातील अशा संपर्कामुळे होणारे परिणाम आणि परस्परसंवाद समजून घेण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. हे गोड्या पाण्यातील अन्न प्रणालींमधील मायक्रोप्लास्टिक प्रदूषणावर सतत लक्ष ठेवण्याचे आणि वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करते. (Microplastic pollution)
 
एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या एन्व्हायर्नमेंटल स्टडीज विभागाच्या पीएच.डी. संशोधक सिमरन सिंग म्हणाल्या, "मायक्रोप्लास्टिक प्रदूषनावरील बहुतांश चर्चा या सागरी पर्यावरणावर केंद्रित असतात. परंतु, गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि पुण्यासारखी अंतर्देशीय शहरे यावर अजूनही तुलनेने पुरेसा अभ्यास झालेला नाही, तरीही ती स्थानिक समुदायांद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या माशांचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. मासे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीचा त्यांचा संपूर्ण प्रवास समजून घेणे हा आमचा उद्देश होता. लहान किरकोळ बाजारांचे सर्वेक्षण करण्याऐवजी आम्ही घाऊक व्यापारी आणि वितरकांवर लक्ष केंद्रित केले, कारण ते पुण्यात गोड्या पाण्यातील मासे येण्याचे प्राथमिक मार्ग आहेत." (Microplastic pollution)
 
वेगाने शहरीकरण होत असलेल्या पुणे शहरात गोड्या पाण्यातील मायक्रोप्लास्टिक प्रदूषणावर मूळ वैज्ञानिक डेटा तयार करणे आणि मायक्रोप्लास्टिक गोड्या पाण्याच्या वातावरणातून अन्नसाखळीत कोणत्या मार्गाने प्रवेश करते हे समजून घेणे, हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. या निष्कर्षांमुळे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गोड्या पाण्यातील परिसंस्थेचे संरक्षण आणि अन्न सुरक्षा यासाठी पुराव्यावर आधारित धोरणात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होऊ शकते. (Microplastic pollution)
 
या संशोधनाला १७ ते १९ जुलै २०२६ दरम्यान एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे येथे आयोजित नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स (NSRTC) मध्ये विशेष मान्यता मिळाली असून, सिमरन सिंग यांच्या पोस्टर सादरीकरणाला तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ही मान्यता पर्यावरण प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि शाश्वत विकास यांच्या संगमावर काम करणाऱ्या आंतरविद्याशाखीय संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करते. (Microplastic pollution)
 
"प्लास्टिक प्रदूषण हा आता केवळ पर्यावरणाचा मुद्दा राहिलेला नसून तो अन्नसाखळीतील विषय बनत चालला आहे. मायक्रोप्लास्टिक कुठून निर्माण होते, ते गोड्या पाण्यातील परिसंस्थेतून कसे प्रवाहित होते आणि शेवटी आपण खातो त्या माशांपर्यंत ते कसे पोहोचते हे समजून घेणे माहितीपूर्ण धोरणे आणि शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे," असे संशोधकांनी सांगितले. (Microplastic pollution)
 
नमुन्यांचे सविस्तर विश्लेषण सुरू असल्याने, एमआयटी-डब्ल्यूपीयूचा हा अभ्यास अंतर्देशीय गोड्या पाण्यातील परिसंस्थेतील मायक्रोप्लास्टिक प्रदूषणावरील वाढत्या वैज्ञानिक पुराव्यांमध्ये मोलाची भर घालण्याचे काम करत आहे. तसेच जलचरांचे आरोग्य, अन्न व्यवस्था आणि मानवी कल्याणावरील याच्या संभाव्य परिणामांकडे वैज्ञानिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. (Microplastic pollution)
 
 




संबंधित मजकूर