कसारा मार्गावर १२ दिवसांचा विशेष ब्लॉक; ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान आसनगाव-कसारा रेल्वे वाहतुकीत बदल

लोकलसह एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम; पहिल्या टप्प्यात दोन दिवस दुपारनंतर लोकल सेवा प्रभावित

    06-Oct-2026
 
Kasara railway block October 2026
 
ठाणे (Kasara railway block October 2026): आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम कसारा मार्गावरील उपनगरीय प्रवाशांवर होणार असून, पहिल्या टप्प्यात ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ वाजेपर्यंत आसनगाव-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहेत. (Kasara railway block October 2026)
 
या कालावधीत आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या ‘अप’ व ‘डाऊन’ मुख्य मार्गिकांसह कसारा स्थानकातील काही प्लॅटफॉर्म आणि ‘अप’ यार्डमध्ये काम केले जाणार आहे.
 
७ आणि ८ ऑक्टोबरला लोकल सेवा आसनगावपर्यंतच
 
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या १३.१०, १४.१७, १४.४६ आणि १६.५० वाजताच्या लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येतील. त्याचप्रमाणे कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या १५.३५, १६.१६, १७.०२ आणि १८.१७ वाजताच्या लोकल अनुक्रमे १६.१२, १६.५४, १७.३९ आणि १८.५४ वाजता आसनगावहून सोडण्यात येतील. (Kasara railway block October 2026)
 
ब्लॉकपूर्वी कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटीहून १२.३० वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल १४.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल १८.२८ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल २०.३५ वाजता सुटेल. (Kasara railway block October 2026)
 
गुरुवारच्या मध्यरात्रीही लोकल रद्द
 
८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून ८ ऑक्टोबरला रात्री २२.४७ आणि ९ ऑक्टोबरला पहाटे ००.०८ वाजता कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल रद्द राहतील. तसेच टिटवाळा-ठाणे २३.१४ वाजताची लोकल आणि ९ ऑक्टोबरला कसाऱ्याहून ०३.५१ वाजताची सीएसएमटी लोकलही रद्द करण्यात आली आहे. (Kasara railway block October 2026)
 
या रात्री ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल २१.३२ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल २२.०० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाऱ्याकडे पहिली लोकल ०४.१९ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहिली लोकल ०४.५९ वाजता सुटेल. (Kasara railway block October 2026)
 
पाच एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल
 
ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्स्प्रेस, एलटीटी-पाटलिपुत्र एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
 
याशिवाय इगतपुरी, खर्डी आणि आटगाव येथे काही एक्स्प्रेस गाड्यांना नियमन करून थांबवण्यात येणार आहे. भुसावळ विभागातही अनेक गाड्यांचे ३० मिनिटांपासून १ तास २५ मिनिटांपर्यंत नियमन करण्यात येणार आहे. (Kasara railway block October 2026)
 
प्रवाशांना गैरसोयीचा इशारा
 
आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून, भविष्यात मार्गाची क्षमता वाढवणे, गाड्यांचे नियमन अधिक सुरळीत करणे आणि अतिरिक्त फेऱ्या हाताळणे शक्य होणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या कामादरम्यान प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
 
७ ते १८ ऑक्टोबरदरम्यानच्या पुढील ब्लॉकचा तपशील मध्य रेल्वेकडून टप्प्याटप्प्याने जाहीर केला जाणार आहे. (Kasara railway block October 2026)
 
 




संबंधित मजकूर