ऑडिओच्या पलीकडे घेणार झेप; 'boAt 2.0' साठी कंपनी सज्ज

नवीन श्रेणी आणि परदेशी बाजारपेठांवर देणार भर

    06-Oct-2026
 

boAt 2.0
 
मुंबई (boAt 2.0): ऑडिओ आणि वेअरेबल्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी 'boAt' (बोट) आता आपल्या वाढीच्या (ग्रोथ) पुढील टप्प्यासाठी नवीन कन्झ्युमर टेक श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग, चार्जिंग सोल्यूशन्स आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या अस्तित्वाचा विस्तार करत आहे. कंपनी या पुढील टप्प्याकडे ‘boAt 2.0’ म्हणून पाहत आहे. या अंतर्गत ऑडिओ हा boAt च्या व्यवसायाचा मुख्य पाया राहील, तर नवीन श्रेणी आणि जागतिक बाजारपेठांना भविष्यातील वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. (boAt 2.0)
 
'boAt 2.0' साठी कंपनी सज्ज:
 
boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले की, "आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही 'boAt 2.0' साठी सज्ज होत आहोत." त्यांनी पुढे नमूद केले की, "आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस्थान आणखी मजबूत करू. सोबतच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि प्रोजेक्टर्स, ग्रूमिंग व चार्जिंग सोल्यूशन्स यांसारख्या नवीन कन्झ्युमर तंत्रज्ञान श्रेणींमधील वाढीवर आमचा विशेष भर असेल. boAt ला भारतातील एक दीर्घकाळ टिकणारी मोठी तंत्रज्ञान कंपनी बनवणे हे आमचे ध्येय आहे." (boAt 2.0)
 
कंपनी झाली बँक कर्जमुक्त:
 
boAt चा हा विस्तार अशा वेळी होत आहे जेव्हा कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपला ताळेबंद आणि नफा क्षमता (प्रॉफिटॅबिलिटी) अधिक मजबूत केली आहे. करांनंतरचा boAt चा नफा ३८ टक्क्यांनी वाढून ८४.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर कंपनी आता पूर्णपणे बँक कर्जमुक्त झाली असून तिच्याकडे सुमारे ३९७ कोटी रुपयांची रोकड राखीव (कॅश रिझर्व्ह) उपलब्ध आहे. गौरव नायर यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आमचे संपूर्ण लक्ष बाह्य आव्हानांचा सामना करत boAt च्या पायाभरणीला अधिक बळकट करण्यावर होते. (boAt 2.0)
 
नवीन श्रेणींमधून मिळतात सकारात्मक संकेत:
 
boAt साठी नवीन क्षेत्रांचे योगदानही वाढू लागले आहे. चार्जिंग सोल्यूशन्स, केबल्स आणि गेमिंगसह कंपनीच्या इतर व्यवसायांचा विभागीय नफा (सेगमेंट प्रॉफिट) आर्थिक वर्ष २६ मध्ये सुमारे १४ कोटी रुपयांवरून वाढून ४६ कोटी रुपये झाला आहे. वेअरेबल्स व्यवसायानेही चांगली पुनर्रचना (टर्नअराउंड) दाखवली आहे. एका वर्षापूर्वी झालेल्या सुमारे ५४ कोटी रुपयांच्या विभागीय तोट्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २६ मध्ये या व्यवसायाने सुमारे ७ कोटी रुपयांचा विभागीय नफा नोंदवला आहे. नायर यांनी सांगितले की, "ऑडिओ क्षेत्रातील आमचे अग्रस्थान अधिक मजबूत होत आहे. वेअरेबल्स व्यवसाय नफ्यात आला आहे आणि नवीन श्रेणींमधूनही चांगला महसूल व नफ्याचे मार्ग खुले होऊ लागले आहेत." (boAt 2.0)
 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही लक्ष:
 
भारताबाहेरही boAt आपला व्यवसाय वाढवत आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय महसूल सुमारे २० कोटी रुपयांवरून वाढून ४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकूण व्यवसायात याचा वाटा सध्या लहान असला, तरी कंपनी याकडे भविष्यातील वाढीची उत्तम संधी म्हणून पाहत आहे. ऑडिओ क्षेत्रात निर्माण झालेली ब्रँडची ओळख, वितरणाचे जाळे आणि ग्राहकांच्या पसंतीची समज यांचा वापर आता इतर तंत्रज्ञान श्रेणींमध्ये करण्याची boAt ची रणनीती आहे. (boAt 2.0)
 
 




संबंधित मजकूर