
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - खोल समुद्रात आढळणाऱ्या १३ प्रजातींच्यानोंदी यंदाच्या पावसाळ्यात पक्षीनिरीक्षकांनी मुंबई महानगरामधून केल्या आहेत (monsoon 2026). नियमितपणे समुद्रावर आढळणाऱ्या पक्ष्यांबरोबरच बचावकेलेले, मृतावस्थेत आढळलेले तसेच निश्चित ओळख न पटलेल्या पक्ष्यांच्या नोंदीही पक्षीनिरीक्षकांनी ठेवल्या आहे
समुद्री पक्षी हे सहसा खोल समुद्रात राहणारे पक्षी असून ते मुख्य भूमीवर क्वचितच दिसतात. त्यांची वीण वसाहत समुद्रातील दूरवरच्या बेटांवर असते. मात्र, पावसाळ्यात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवारे आणि जोरदार पावसामुळे हे पक्षी समुद्रातून भरकटून किनाऱ्याजवळ किंवा शहरांमध्ये येतात. अशाच पद्धतीने मुंबईच्या किनारी प्रदेशात आलेल्या पक्ष्यांच्यानोंदी मुंबईतील पक्षीनिरीक्षकांनी ठेवल्या आहेत. अशा पद्धतीने यंदा नैसर्गिकरीत्या आढळलेल्या समुद्री पक्ष्यांच्या नोंदींमध्ये तपकिरी डोलमान्या (ब्राऊन नाॅडी) हा खोल समुद्रात आढळणारा पक्षी मुंबईतील किनारी प्रदेशात सर्वाधिक आढळला. त्याच्या १७ नोंदी झाल्या. त्यानंतर पांढऱ्या गालाचा सुरय (White-cheeked Tern) पक्ष्यांच्या १४, आर्टिक सुरयच्या १३, छोट्या डोलमान्याच्या ११ आणि लगाम सुरयच्या नऊ नोंदी झाल्या आहेत. विल्सन स्ट्रोम पेट्रेल या पक्ष्याच्या पाच,सौंडर्सचासु
यंदाच्या पावसाळ्यात समुद्र पक्ष्यांच्या हालचालींचे जुलै-केंद्रित स्वरूप विशेषठ ळक राहिले. पक्षीनिरीक्षक मयुरेश परब यांच्या मते मुंबईत गेल्या काही वर्षांत दिसून येणाऱ्यापद्धतीप्रमाणे यंदाही जोरदार पाऊस आणि वाऱ्याच्या सत्रांनंतर समुद्री पक्ष्यांचावावर वाढला. विशेषतःनाॅडी म्हणजेच डोलमान्या या समुद्री पक्ष्यांच्या काही प्रजाती अशाहवामानानंतर आणखी काही दिवस मुंबईच्या किनाऱ्यालगत दिसून आल्या. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतून तुलनेत कमी समुद्रीपक्ष्यांच्या नोंदी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये समुद्री पक्ष्यांचा वावर जवळपास संपुष्टात आला असतानाच यंदाच्या यादीत लाल मानेचा फलारोप या पक्ष्याची भरपडली.५ आणि १४ सप्टेंबर रोजीया प्रजातीच्या दोन नोंदी झाल्या. हीच सप्टेंबरमधील एकमेव नवीन समुद्री पक्षी प्रजात ठरली. एकूण नोंदींच्या दृष्टीने यंदाचा पावसाळा जुलैतील जोरदार वाढ आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये टिकून राहिलेला समुद्री पक्ष्यांचा वावर यासाठी लक्षात राहणारा ठरला.