एसएनडीटी विद्यापीठात युवा महोत्सव २०२६-२७ संपन्न

    05-Oct-2026   

SNDT Youth Festival 2026-27
 
मुंबई(SNDT Youth Festival 2026-27): एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ‘एसएनडीटी ग्रँड फायनल युवा महोत्सव २०२६-२७’ उत्साहात पार पडला. दि. २ व ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या महोत्सवात नाट्य, संगीत, नृत्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध सांस्कृतिक प्रकारांमध्ये विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
 
महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील पाटकर सभागृहात विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल प्रा डॉ हेमलता के. बागला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री पूजा सावंत प्रमुख पाहुण्या, तर प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीत दिग्दर्शिका वैशाली सामंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. विलास नांदवडेकर होते. तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. नितीन एस. प्रभुतेंडोलकर उपस्थित होते.(SNDT Youth Festival 2026-27)
 
या महोत्सवात उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ (प.), मुंबई यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एससीबी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर विमेन, मरीन लाइन्स, मुंबई यांना सर्वसाधारण प्रथम उपविजेतेपद, तर श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला कला व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), माटुंगा (पूर्व), मुंबई यांना सर्वसाधारण द्वितीय उपविजेतेपद मिळाले.(SNDT Youth Festival 2026-27)
 
विविध स्पर्धांमध्येही महाविद्यालयांनी उल्लेखनीय यश संपादन केले. नाट्य विभागात मणिबेन नानावटी महिला महाविद्यालय, विलेपार्ले (प.) विजेते ठरले, तर उषा मित्तल इन्स्टिट्यूट प्रथम उपविजेते ठरले. संगीत विभागात एसएनडीटी विद्यापीठाच्या पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्राने विजेतेपद मिळवले. नृत्य विभागात एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, जुहू विजेते ठरले. ललित कला विभागात मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयाने, तर साहित्य विभागात अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्चने विजेतेपद पटकावले.(SNDT Youth Festival 2026-27)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर