राज्यपालांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू) लिखित ‘संत रविदास म्हणे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

    05-Oct-2026
 
Anna Bhau Sathe Books
 
मुंबई (Anna Bhau Sathe Books): राज्यपालांच्या हस्ते मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन आणि चिंतन’, 'अण्णाभाऊ साठे : आकलन आणि आस्वाद' व ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय डॉ बळीराम गायकवाड, डॉ माणिक सोनावणे व डॉ धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांनी संपादित केलेल्या 'अण्णाभाऊ साठे : अ ट्रान्सनॅशनल लिटररी लेगसी' या इंग्रजी पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. (Anna Bhau Sathe Books)
 
यावेळी बोलताना राज्यपालांनी लिखाण हा समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे सांगितले. महान व्यक्तींवरील लिखाणाच्या माध्यमातून त्यांचे विचार व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होते असे राज्यपालांनी सांगितले. (Anna Bhau Sathe Books)
 
साहित्याचा अंतिम उद्देश समाजात एकोपा निर्माण करणे आणि जीवन उन्नत करणे हा आहे. भारतातील संत परंपरा ही समानतेची चळवळ होती. मात्र,या चळवळीच्या योगदानाची इतिहासात पुरेशी नोंद झालेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले. (Anna Bhau Sathe Books)
 
साहित्य विविध भाषा आणि पिढ्यांना जोडण्याचे कार्य करते, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, काळाच्या ओघात लोक चित्रपट कलाकार आणि राजकारण्यांना विसरतील; परंतु महान लेखक आणि कवींना विसरत नाहीत. कालिदास, मुन्शी प्रेमचंद आणि शेक्सपिअर यांच्या साहित्यकृती आजही जिवंत आहेत, कारण उत्तम लेखन मन आणि हृदय या दोन्हींना स्पर्श करते, असे राज्यपालांनी सांगितले. (Anna Bhau Sathe Books)
 
महाराष्ट्राला समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चांगल्या साहित्याचा आजही समाजाकडून आदर केला जातो असे सांगताना राज्यपालांनी फुलांऐवजी पुस्तके भेट द्यावेत असे आवाहन केले. फुले कोमेजून जातात; मात्र एखादे पुस्तक कुणीतरी, कुठेतरी आणि कधीही वाचू शकते. त्या पुस्तकातील दोन पाने जरी वाचली, तरी त्याचा वाचकाच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले. (Anna Bhau Sathe Books)
 
लेखन हे लेखकांच्या विचारांना आणि कल्पनांना पंख देण्याचे कार्य करते. त्यामध्ये प्रेरणा देण्याची आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे. त्यामुळे लेखन आणि लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच आपला समृद्ध साहित्यिक वारसा जतन करून तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. (Anna Bhau Sathe Books)
 
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, विष्णु वझे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आदी उपस्थित होते. (Anna Bhau Sathe Books)
 
 




संबंधित मजकूर