स्वदेशी, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या संकल्पनेत ‘लिज्जत’चे मोठे योगदान : मनोज गोयल

    05-Oct-2026

Lijjat Papad
 
मुंबई (Lijjat Papad) : “श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड” या महिलांची, महिलांद्वारा महिलांसाठी कार्यरत संस्थेची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या आणि संस्थेच्या देशभरातल्या विविध शाखा-विभागांमधून आलेल्या हजारो सदस्य-भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाली. (Lijjat Papad)
 
या सभेला भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाअंतर्गत कार्यरत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे माननीय अध्यक्ष मनोज गोयल, विशेष अतिथी — टिसर आर्टिझन्स ट्रस्टच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. मेघा फणसळकर, आयोगाचे आर्थिक सल्लागार जे. सरवणन (IRS), महाराष्ट्र राज्य निदेशक योगेश भामरे, स्टॅट्युटरी ऑडिटर परेश डॉक्टर आणि अन्य अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली. (Lijjat Papad)
 
या प्रसंगी उपस्थित मुख्य अतिथी मनोज गोयल यांनी संस्थेच्या कार्याचे तसेच नारी शक्तीचे कौतुक करत आपल्या भाषणात सांगितले, “लिज्जत पापडला आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनविणाऱ्या संस्थेच्या सर्व भगिनींना माझा मनःपूर्वक नमस्कार. मी जिथे कुठे जातो, तिथे सर्वांना हेच सांगतो की, कोणाला ‘आत्मनिर्भर भारताची’ गाथा शिकायची असेल, जाणून घ्यायची असेल, तर त्यांनी लिज्जतच्या भगिनींकडून शिकावे. संस्थेची शिस्त आणि मेहनत प्रशंसनीय आहे. या देशाच्या नारी शक्तीसाठी लिज्जत संस्था एक प्रेरणास्थान आहे.” (Lijjat Papad)
 
“लिज्जत”सारखी संस्था, जी भारताचा गौरव आहे, अशी संस्था के.व्ही.आय.सी.शी जोडलेली आहे, हे के.व्ही.आय.सी.चे सौभाग्य आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वदेशी’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे व्हिजन तसेच ‘विकसित भारत’चा संकल्प साकार करण्याच्या दिशेने जर कोणी निष्ठेने कार्य केले असेल, तर त्यामध्ये ‘लिज्जत’चे नाव येणे स्वाभाविक आहे. (Lijjat Papad)
 
तसेच, जेव्हा के.व्ही.आय.सी.चा विषय येतो, तेव्हा मला असे वाटते की लिज्जत पापडशिवाय के.व्ही.आय.सी.ची कहाणी अपूर्ण आहे. के.व्ही.आय.सी. आणि लिज्जत जणू एकमेकांसाठीच निर्माण झाले आहेत. आजच्या के.व्ही.आय.सी.शी संबंधित संस्थांमधील कारागिरांमध्ये ८० टक्के महिला आहेत, ही अभिमानाची बाब आहे आणि आयोगाचे अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे.” या प्रसंगी त्यांनी आयोगाची कार्यक्षमता, व्यवस्थापन तसेच तत्परतेचे कौतुक करताना सांगितले की, “आयोगाने ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या’ माध्यमातून संपूर्ण देशात १० लाखांहून अधिक ग्रामीण उद्योगांची स्थापना केली आहे.” यावेळी त्यांनी अभिमानाने नमूद केले की, यावर्षी खादीची विक्री रु. १.८७ लाख कोटी इतकी झाली आहे. (Lijjat Papad)
 
ते पुढे म्हणाले, “लिज्जत संस्थेचा विस्तार कोणत्याही एका गावापुरता मर्यादित न राहता देशातील १६ राज्यांमध्ये ८३ शाखांच्या माध्यमातून झाला आहे आणि सुमारे ५० हजार भगिनी या संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार करीत आहेत.” संस्थेच्या अध्यक्षा स्वाती रविंद्र पराडकर यांच्या कार्याचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “स्वातीताई यांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या संख्येने हे संघटन कार्यरत आहे, ही एक व्यापक चळवळ आहे. लिज्जतची कहाणी सर्वव्यापी आणि विराट आहे. आयोग आणि लिज्जत यांचा संबंध सहा दशकांचा आहे आणि आम्ही हे जाणले आहे की, आपल्या यशाचे गमक आपल्या मूलभूत तत्त्वप्रणालीमध्ये आहे. त्यामध्ये अग्रस्थानी आहे ‘लिज्जतची गुणवत्ता’, ज्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही.” (Lijjat Papad)
 
लिज्जतची निर्यात विक्री ६० कोटींची आहे. यावरून हे दिसून येते की, खऱ्या अर्थाने जर कोणी पंतप्रधानांचे “लोकल ते ग्लोबल” हे व्हिजन साकार केले असेल, तर ते ‘लिज्जत पापड’ने केले आहे.
सभेत उपस्थित विशेष अतिथी आदरणीय डॉ. मेघाताई फणसळकर यांनी उपस्थित सदस्य-भगिनींना संबोधित करताना सांगितले, “लिज्जत पापडची चव आपण सर्वांनी लहानपणापासून अनुभवली आहे, पापडाशिवाय आपले जेवण अपूर्ण वाटते. मात्र, पापडापासून परिवर्तन आणि लिज्जतपासून आत्मनिर्भरतेपर्यंतची जी यात्रा आहे, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.”
संस्थेने सुरुवातीपासून ज्या मूलभूत विचारांचे पालन केले, ज्यामुळे या संस्थेचा पाया मजबूत झाला, त्यापैकी एक महत्त्वाचा विचार म्हणजे येथे केवळ महिलाच कार्यरत आहेत. हीच संस्थेची सर्वात मोठी ताकद आहे. (Lijjat Papad)
 
दुसरी ताकद म्हणजे येथे आजही पापड हाताने बनविले जातात. केवळ नफा कमावण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात आलेला नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार व उपजीविका प्राप्त झाली आहे.
या तिन्ही कारणांमुळे संस्थेची प्रगती उल्लेखनीय झाली आहे. महिला एकत्र आल्या तर परिवर्तन निश्चित होते, हा आदर्श लिज्जतने निर्माण केला आहे. (Lijjat Papad)
 
लिज्जतने आज जगात जे स्थान निर्माण केले आहे, ते आपल्या मेहनत आणि निष्ठेच्या बळावर मिळविले आहे. ज्या कार्यातून आपल्याला आनंद/समाधान मिळते, त्या कार्याला सफलता प्राप्त होतेच. हिंदीमध्ये एक म्हण आहे — ‘यह काम करने के लिए मैंने बहुत पापड़ बेले हैं’, म्हणजेच एखादे काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. याचा अर्थ असा की पापड बनविणे हे काही सोपे काम नाही, त्यामध्ये खूप परिश्रम आवश्यक असतात. परंतु, तुम्ही सर्व भगिनींनी आपल्या निष्ठेने आणि मेहनतीने हे काम इतक्या सहजतेने केले आहे की, जणू तुम्ही या उद्योगाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. (Lijjat Papad)
 
लिज्जतच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी उपस्थित अतिथी मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा केली. या प्रसंगाचा लाभ घेत त्यांनी आयोगाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल सर्व भगिनींच्या वतीने आयोगाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, संस्थेच्या सदस्य-भगिनींच्या मेहनत व समर्पणाच्या भावनेमुळे संस्थेने यावर्षी साध्य केलेल्या प्रगतीचा त्यांनी विशेष आढावा घेतला आणि सर्व भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. (Lijjat Papad)
 
 




संबंधित मजकूर