किट विद्यापीठाची मोठी झेप; भारतात चौथा, पूर्व भारतात अव्वल

    05-Oct-2026
KIIT University Ranking 2027
 
मुंबई : टाइम्स हायर एज्युकेशनच्या (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२७मध्ये ओडिशातील किट डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीने (KIIT-DU) भारतातील विद्यापीठांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, पूर्व भारतातील विद्यापीठांमध्ये किटने अव्वल स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत किटच्या राष्ट्रीय क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा झाली आहे.
जागतिक क्रमवारीत किटला ५०१-५५० या गटात स्थान मिळाले आहे. जगभरातील सहभागी संस्थांची संख्या वाढलेली असतानाही किटने आपली क्रमवारी सुधारली आहे. विद्यापीठाच्या कामगिरीत अध्यापनाचा दर्जा, संशोधनाचे वातावरण, उद्योग क्षेत्राशी असलेला सहभाग आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या प्रमुख बाबींमध्ये सुधारणा झाल्याचे या क्रमवारीतून दिसून येते.
किटच्या मते, संस्थात्मक विकासासाठी आखलेल्या दीर्घकालीन धोरणांसह मजबूत गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती साध्य झाली आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वाची दूरदृष्टी, प्राध्यापकांची मेहनत, संशोधकांचे योगदान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी समुदाय यांचाही या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना किट आणि किसचे संस्थापक डॉ. अच्युत सामंत म्हणाले की, प्रत्येक राज्याची आपल्या विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावे, अशी अपेक्षा असते. इतर अनेक विद्यापीठांच्या तुलनेत किट हे तुलनेने तरुण विद्यापीठ असूनही जागतिक स्तरावरील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. हे यश ओडिशासह संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील आघाडीची विद्यापीठे
THE वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२७मध्ये भारतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळुरू प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस दुसऱ्या, तर शुलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. किट विद्यापीठाने चौथे स्थान मिळवले आहे.
या क्रमवारीत भारतातील १४३ विद्यापीठांचा समावेश असून, जगातील ११८ देशांमधील २,२९७ विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. अध्यापन व संशोधनाची गुणवत्ता, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन यांसह विविध निकषांच्या आधारे टाइम्स हायर एज्युकेशनकडून ही क्रमवारी निश्चित केली जाते.
 
 




संबंधित मजकूर