
मुंबई -Ankush Choudhary मुंबईच्या सांस्कृतिक आणि चित्रपट जगताचे केंद्र असलेल्या दादरमध्ये सिनेरसिकांसाठी मनोरंजनाचे एक नवे आणि अत्याधुनिक ठिकाण सज्ज झाले आहे. दादर येथील डॉ. आंबेडकर रोडवर, पूर्वीचे 'हिंदमाता चित्रपटगृह' काळाच्या ओघात पुढे 'हिंदमाता गोल्ड' झाले आणि आता याच ऐतिहासिक जागेवर कुमार फन शॉपच्या दुसऱ्या मजल्यावर ‘HM Cinema’ (हिंदमाता एच. एम. सिनेमा) झाले आणि याचे भव्य उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी यांच्या शुभहस्ते या नव्या चित्रपटगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक सिनेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'HM Cinema' मध्ये प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, दर्जेदार डिजिटल स्क्रीन आणि अत्यंत आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे.Ankush Choudhary
उद्घाटन सोहळ्याबद्दल बोलताना अंकुश चौधरी म्हणाले, "दादर हे मुंबईच्या संस्कृतीचे आणि चित्रपटप्रेमाचे हृदयस्थान आहे. एकेकाळी 'हिंदमाता', नंतर 'हिंदमाता गोल्ड' आणि आता 'HM Cinema' च्या आधुनिक रूपात प्रेक्षकांसाठी हे दर्जेदार थिएटर पुन्हा सज्ज झाले आहे, याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो. आजच्या काळात प्रेक्षकांना थिएटरमध्ये उत्कृष्ट साऊंड, व्हिज्युअल्स आणि आरामदायी वातावरण हवे असते. HM Cinema प्रेक्षकांच्या या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे. मराठी तसेच सर्वच भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळो, हीच माझी मनापासून सदिच्छा!"Ankush Choudhary
थिएटरचे मालक संकेत पाटील म्हणाले, "प्रेक्षकांना सर्वोत्तम चित्रपट अनुभव देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 'हिंदमाता'पासून सुरू झालेला हा वारसा पुढे नेऊन, दादरसारख्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक भागात 'HM Cinema' सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. आम्ही थिएटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम स्क्रीन आणि आरामदायी बैठक व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या हस्ते आमच्या या नव्या प्रवासाची सुरुवात झाली, ही आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. आम्ही सर्व सिनेरसिकांना HM Cinema मध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत."Ankush Choudhary