मुंबईत हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी अ‍ॅक्शन मोडवर; ’कृती आराखडा-२०२६’ अंतर्गत वॉर्डनिहाय कडक कारवाई सुरू

    04-Oct-2026
       
Mumbai Air Pollution Action Plan 2026  
 
मुंबई (Mumbai Air Pollution Action Plan 2026): मुंबई महापालिकेने ’वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ अधिकृतपणे जाहीर केला असून, या अंतर्गत ३ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय वॉर्ड्समध्ये अत्यंत कडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाढत्या बांधकामांची ठिकाणे आणि धूळ प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.या विशेष मोहिमेतंर्गत प्रत्येक वॉर्डमधील किमान १० प्रमुख प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. (Mumbai Air Pollution Action Plan 2026)
 
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीने पहिल्यांदाच वॉर्ड स्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे.: प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.मोठी पायाभूत सुविधांची बांधकामे (उदा. मेट्रो, कोस्टल रोड), खासगी इमारतींचे बांधकाम, वाहतूक कोंडीची मुख्य जंक्शन, कचरा उघड्यावर जाळली जाणारी ठिकाणे आणि कचरा टाकल्या जाणार्‍या जागा या हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट आहेत. या निश्चित केलेल्या जागांवर पालिकेचे अधिकारी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्ष भेटी देऊन २४ तास नजर ठेवत आहेत. (Mumbai Air Pollution Action Plan 2026)
 
२८ मुद्द्यांच्या नियमावलीची कडक सक्ती
 
प्रदूषण आराखड्यानुसार, मुंबईतील सर्व विकासक आणि बांधकाम कंपन्यांना पालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
 
१. बॅरिकेडिंग आणि आच्छादन: सर्व बांधकाम साईट्सच्या भोवती किमान २५ ते ३० फूट उंच पत्रे (बॅरिकेड्स) लावणे आणि बांधकाम सुरू असलेली इमारत हिरव्या कापडाने किंवा ताडपत्रीने पूर्णपणे झाकणे अनिवार्य आहे.
 
२. वॉटर स्प्रिंकलर्स: हवेत धूळ उडू नये म्हणून बांधकाम ठिकाणी सातत्याने पाण्याचे कारंजे (थरींशअ‍ॅ डिअ‍ॅळपज्ञश्रशअ‍ॅी) किंवा अँटी-स्मॉग गन वापरणे बंधनकारक आहे.
 
३. वाहतुकीचे नियम: वाहनांमधून बांधकाम साहित्य वाहून नेताना ते पूर्णपणे झाकलेले असावे आणि चाकांभोवतीची माती रस्त्यावर येऊ नये म्हणून वाँशिग बे (थहशशश्र थरीहळपस) ची सोय असणे आवश्यक आहे.
 
नियम तोडणार्‍यांना थेट ’स्टॉप वर्क’ नोटीस: मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्‍या बांधकाम साईट्सना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थेट ’काम बंद’ करण्याचे आणि दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbai Air Pollution Action Plan 2026)
 
महापालिकेची कारवाई
 
हवेतील तरंगते धूलिकण (जमिनीवर बसवण्यासाठी पालिकेने १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण मुंबईत विशेष रस्ते धुण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पालिकेचे टँकर्स पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून दररोज रात्री आणि पहाटेच्या वेळी मुख्य रस्ते स्वच्छ धुत आहेत.े. उघड्यावर कचरा अथवा प्लास्टिक जाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट संकेत बीएमसी प्रशासनाने आज दिले आहेत. (Mumbai Air Pollution Action Plan 2026)
 
 




संबंधित मजकूर