दुर्गाडी किल्ल्यामागील अनधिकृत तबेला, पार्किंग हटवण्याची शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांची मागणी..

नवरात्रोत्सवापूर्वी कारवाईची नगरसेवक जयवंत भोईर यांची मागणी

    04-Oct-2026
 
Durgadi Fort Illegal parking     
 
ठाणे (Durgadi Fort Illegal parking): गोविंदवाडी बायपासच्या कामामुळे बाधित झालेला तबेला तात्पुरत्या स्वरूपात दुर्गाडी किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र, तबेला स्थलांतरित होऊन तब्बल दहा वर्षे उलटूनही तो हटविण्यात आलेला नसल्याने किल्ला परिसराच्या विद्रुपीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अनधिकृत तबेल्यासह किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेले अनधिकृत पार्किंग तातडीने हटवावे, अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर यांनी केली आहे. (Durgadi Fort Illegal parking)
 
गोविंदवाडी बायपासच्या कामासाठी बाधित होणारा तबेला काही काळासाठी किल्ल्याच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हलविण्यात आला होता. मात्र, तात्पुरत्या व्यवस्थेचे दहा वर्षांनंतरही कायमस्वरूपी रूपांतर झाले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिक परिसराचा वापर अनधिकृतपणे होत असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. (Durgadi Fort Illegal parking)
तबेल्याबरोबरच किल्ल्याच्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने परिसराला अवकळा आली आहे. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसराचे जतन करण्याऐवजी त्याचा अशा प्रकारे गैरवापर सुरू राहणे योग्य नाही, अशी भूमिका भोईर यांनी मांडली. (Durgadi Fort Illegal parking)
 
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे नवरात्रोत्सवापूर्वीच अनधिकृत तबेला आणि पार्किंग हटवून परिसर मोकळा करावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे. दरम्यान, अनधिकृत तबेला हटविण्याचे आदेश स्थायी समिती सभापतींनीही प्रशासनाला दिले असल्याचे भोईर यांनी सांगितले. (Durgadi Fort Illegal parking)
 
 




संबंधित मजकूर