ठाणे (KDMC Unauthorized Meat Shops) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील संशयित बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांकडून चालविल्या जाणार्या अनधिकृत चिकन-मटण दुकानांना पालिकेतील भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्यांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप सकल हिंदू समाजाचे गणेश गोवेकर यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने गोवेकर यांनी गांधी जयंतीच्या दिवशी महापौरांच्या दालनासमोर आमरण उपोषणाचा इशारा देत आंदोलन सुरू केले. त्याची तातडीने दखल घेत महापौर अॅड. हर्षाली थविल-चौधरी यांनी, "येत्या सोमवारी सर्व वॉर्ड आयुक्त आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन कारवाईचे निर्देश येतील,” असे आश्वासन दिले.
पालिका क्षेत्रात दोन वर्षांत अनेक बांगलादेशी घुसखोरांच्या अनधिकृत दुकानांची संख्या वाढल्याचा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे. तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची हालचाल याबाबत दिसून येत नाही. संबंधित दुकानांचे परवाने, स्वच्छता व्यवस्था, अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि व्यावसायिकांची वैध कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील काही अधिकारी दुकानदारांकडून लाच व हप्ते घेऊन कारवाई जाणीवपूर्वक टाळत असल्याचा आरोपही करण्यात आला. काही वर्षांपूर्वी मटण दुकानाच्या परवाना प्रकरणात महापालिका कर्मचार्याला लाच घेताना रंगेहाथ अटक झाल्याची आठवण सकल हिंदू समाजाने करून दिली. (KDMC Unauthorized Meat Shops)
उपोषणाच्या इशार्यानंतर महापौरांची तातडीची दखल
महापौर अॅड. हर्षाली थविल-चौधरी यांनी या तक्रारींची दखल घेत सोमवारी पालिकेच्या सर्व वॉर्ड आयुक्तांसह संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन या घुसखोरांच्या अनधिकृत दुकानांबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (KDMC Unauthorized Meat Shops)
महापालिका अधिकारी देशद्रोही आहेत का?
‘केडीएमसी’ अधिकारी यांना आम्ही देशद्रोही म्हणावे का? कारण, आम्ही सर्व पुरावे देऊनही गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही कारवाई होत नाही. उलट, तक्रारी केल्यानंतर दुकानदारांकडून हप्ते घेतले जात आहेत. दोन वर्षांपूर्वी एका पालिका कर्मचार्याला रंगेहाथ अटकही झाली होती. या विदेशी घुसखोरांना अभय देणार्यांनी भानावर यावे आणि लवकरात लवकर कारवाई करावी.- गणेश गोवेकर, सकल हिंदू समाज
सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर
संशयित बांगलादेशी घुसखोरांकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याचा दावाही गोवेकर यांनी महापौरांसमोर केला. नेवाळी परिसरातील एका प्रकरणाचा संदर्भ देत संबंधित व्यक्तीला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून ‘एटीएस’ने अटक केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. (KDMC Unauthorized Meat Shops)