‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष; ब्लेझर काढून केला भन्नाट डान्स!

    04-Oct-2026
 KBC Marathi Madhuri Dixit
 
मुंबई (KBC Marathi Madhuri Dixit) : अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा चाहता असलेल्या जळगावच्या शरद राजपूत यांच्यासाठी ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसण्याचा क्षण खास ठरला. टी-शर्टवर माधुरी दीक्षित यांचा फोटो आणि समोर प्रत्यक्ष माधुरी... आपल्या लाडक्या अभिनेत्रीसमोर बसण्याची संधी मिळाल्याने शरद यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
 
‘कोण होणार करोडपती’च्या पहिल्या स्पर्धकाची झलक दाखवणाऱ्या व्हिडीओमध्ये शरद यांचा उत्साह पाहायला मिळतो. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच त्यांनी चक्क ब्लेझर काढला आणि सेटवर नाचत जल्लोष केला. विशेष म्हणजे, याच वेळी त्यांच्या टी-शर्टवरील माधुरी दीक्षित यांचा फोटोही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसला. आपल्या आवडत्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याचा आनंद शरद यांनी अशा अनोख्या अंदाजात व्यक्त केला. (KBC Marathi Madhuri Dixit)
 
माधुरींचा मिश्किल सवाल अन् सेटवर हशा!
 
या भागातील आणखी एक मजेशीर क्षण म्हणजे माधुरी दीक्षित यांनी शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल विचारले. त्यावर शरद हसत म्हणाले, “ती माझं सगळं ऐकते.” शरद यांचे हे उत्तर ऐकताच माधुरी यांनी मिश्किल अंदाजात विचारले, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?”
 
माधुरींच्या या भन्नाट प्रश्नावर सेटवर एकच हशा पिकला. स्पर्धकासोबतची त्यांची ही दिलखुलास बातचीत आता प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेत आहे. (KBC Marathi Madhuri Dixit)
 
माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
 
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वातून माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे ज्ञान, मनोरंजन आणि भावनिक अनुभवांनी भरलेला हा शो यंदा नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.
 
माधुरींच्या सूत्रसंचालनात प्रेक्षकांना स्पर्धकांच्या मनमोकळ्या गप्पा, त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी आणि भावूक करणाऱ्या कथा तसेच माधुरींसोबतचे अविस्मरणीय क्षण अनुभवता येणार आहेत. (KBC Marathi Madhuri Dixit)
 
 




संबंधित मजकूर