दोन वर्षांची प्रतीक्षा संपली; १७ कुटुंबांच्या स्वप्नांना मिळाले हक्काचे घर

गिरीश केणी चाळ रहिवाशांकडून मुंबई भाजप महामंत्री विनोद शेलार यांचा सत्कार; भावना व्यक्त करताना रहिवाशांचे डोळे पाणावले

    31-Oct-2026   
 
 
Girish Keni Chawl Rehabilitation
 
मुंबई (Girish Keni Chawl Rehabilitation) : मालाड पश्चिम येथील नूतन कॉलेजसमोरील गिरीश केणी चाळीतील १७ कुटुंबांच्या दोन ते तीन वर्षांच्या संघर्षाला शुक्रवारी अखेर यश आले. मुंबई भाजपा महामंत्री विनोद शेलार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कुटुंबांना पर्यायी हक्काची घरे मिळाली. याबद्दल गिरीश केणी चाळीतील रहिवाशांनी विनोद शेलार यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. (Girish Keni Chawl Rehabilitation)
 
गिरीश केणी चाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या कक्षेत येत असल्याने येथील रहिवाशांसमोर पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पर्यायी घरे उपलब्ध होत नसल्याने १७ कुटुंबे आपल्या भवितव्याबाबत चिंतेत होती. अशा कठीण परिस्थितीत विनोद शेलार यांनी या रहिवाशांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. (Girish Keni Chawl Rehabilitation)
 
त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि संबंधित प्रशासकीय विभागांशी सातत्याने समन्वय साधत पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या उपस्थितीत १७ कुटुंबांना पर्यायी घरांचे अलॉटमेंट लेटर (ताबा पत्र) आणि घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. (Girish Keni Chawl Rehabilitation)
 
या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज रहिवाशांनी विनोद शेलार यांचा सत्कार केला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक रहिवाशांचे डोळे अक्षरशः पाणावले. वर्षानुवर्षांची चिंता, घरासाठी केलेला संघर्ष आणि अखेर मिळालेला हक्काचा निवारा यामुळे त्यांच्या भावनांना वाट मोकळी झाली. (Girish Keni Chawl Rehabilitation)
 
"आमच्या कठीण काळात विनोद शेलार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आमच्या हक्काच्या घरासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा आणि घेतलेले कष्ट आम्ही कधीही विसरणार नाही. आज आमच्या हातात घराच्या चाव्या आहेत, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे," अशा भावना रहिवाशांनी यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी कमिटी सदस्य प्रसाद माशेळकर, जयेश मेस्त्री, साई गडेकर, सत्यवान गुरव, नारायण गुरव, राजन मसके आणि कृष्णा बामगुडे यांच्यासह चाळीतील रहिवासी उपस्थित होते. (Girish Keni Chawl Rehabilitation)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर