कानपूरमध्ये ४०० जणांच्या धर्मांतरणाचा डाव हिंदुत्ववाद्यांनी उधळला

    31-Oct-2026   
 
Kanpur Religious Conversion Allegation
 
मुंबई () : कानपूरच्या भूमीत धर्मांतराच्या एका मोठ्या षड्यंत्राचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रार्थना सभेच्या नावाखाली तब्बल ४०० निष्पाप लोकांचे धर्मांतर घडवून आणण्याचा कुटिल डाव आखण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या तयारीत होती. (Kanpur Religious Conversion Allegation)
 
मिळालेल्या माहितीनुसार, दूरवरच्या भागांतून शेकडो लोकांना या गूढ कार्यक्रमासाठी गोळा करण्यात आल्याची ठोस माहिती मिळताच हिंदू संघटनेचे नेते कृष्णा तिवारी हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धावून गेले. मात्र कार्यक्रमाचा मुख्य दरवाजाच बंद करून घेतला होता आणि त्यांना तब्बल २५ मिनिटे बाहेर रोखून धरले होते. या २५ मिनिटांच्या कालावधीत मुख्य संशयित आरोपी मागच्या दरवाजातून पसार झाले. (Kanpur Religious Conversion Allegation)
 
दरम्यान, कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडणाऱ्या मीना नावाच्या महिलेने अशी कबुली दिली की, आम्ही ख्रिश्चन कमिटीच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायला आलो होतो. आम्ही हिंदू असलो तरी गेल्या चार वर्षांपासून मूर्तिपूजा करणे सोडून दिले आहे आणि इथे माणुसकीची पूजा शिकवली जाते. एका सामान्य महिलेच्या तोंडून आलेले हे वाक्य कानपूरमध्ये धर्मांतराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हेच स्पष्ट करत आहे. हिंदू संघटनांनी आता या प्रकरणाविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून, या षड्यंत्रामागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Kanpur Religious Conversion Allegation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर