भावबंधांची हळवी गोष्ट उलगडणारा ‘बंधू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

    31-Oct-2026
 
 
 
 
bandhu
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी ) - Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून व्यक्त झालेलं भावाचं नातं असंच काहीसं असतं. कधी एकमेकांशी भांडणारं, कधी रुसणारं, तर कधी स्वतःपेक्षाही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारं! या नात्यात कितीही मतभेद झाले, दुरावा निर्माण झाला, तरी मनाच्या एका कोपऱ्यात एकमेकांसाठी असलेली जागा कायम असते. याच अतूट भावबंधांची, प्रेमाची आणि त्यागाची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन येणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या दमदार अभिनयाची झलक असलेला हा ट्रेलर दोन भावांच्या नात्यातील विविध भावनिक पैलू उलगडतो. ‘बंधू’ चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अल्पावधीतच ‘बंधू’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या ट्रेलरने ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवले आहे.
रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत. यांच्यासह रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव हे कलाकार दिसणार आहेत.Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या प्रत्येक कलाकाराने आणि तंत्रज्ञाने आपलं मन, भावना आणि मेहनत या कलाकृतीसाठी दिली आहे. रजत बेदी यांचं प्रस्तुतकर्ता म्हणून लाभलेलं पाठबळ आणि संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनातील भावबंधांना नक्कीच स्पर्श करेल, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या.
Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
“चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात. ‘बंधू’ची कथा अशीच मनाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमाशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडले जाणं माझ्यासाठी एक खास अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून या नात्याचं भावविश्व जिवंत केलं आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपलंसं करावं, हीच अपेक्षा आहे;असे रजत बेदी म्हणाले.Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
‘बंधू’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला चित्रपटाच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
चित्रपटातील गीतांना गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले असून, विजय नारायण गवंडे यांच्या संगीताने ती सजली आहेत. लोकप्रिय गायक अजय गोगावले, अतुल गोगावले, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या सुरेल आवाजाची साथ या गीतांना लाभली आहे. या चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत. नृत्यदिग्दर्शन अविनाश नलावडे आणि नील राठोड यांनी केले असून, वेशभूषा कीर्ती जंगम आणि रंगभूषा समीर रमेश कदम यांची आहे. छायांकन हर्षद आत्माराम गायकवाड यांचे असून, अतिरिक्त छायांकन योगेश कोळी यांनी केले आहे. संकलन वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी केले असून, साहसदृश्ये बब्बू खन्ना यांनी साकारली आहेत.
Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
एकमेकांसाठी जगणाऱ्या दोन भावांच्या नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणारी ठरेल. नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची जाणीव करून देणारा ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.Bandhu Movie Trailer Jitendra Joshi Upendra Limaye
 




संबंधित मजकूर