मुंबई - Zee Marathi meghna erande आपल्या आवडत्या कलाकारांना एकाच मंचावर पाहण्यासाठी आणि त्यांच्या दमदार परफॉर्मन्सचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक 'झी मराठी अवॉर्ड्स २०२६' या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. जितकी उत्सुकता प्रेक्षकांना या सोहळ्याची असते, तितकीच उत्सुकता कलाकारांनाही असते. या खास सोहळ्यासाठीची तयारी, रंगमंचावर एकत्र येऊन काहीतरी वेगळं सादर करण्याची संधी आणि प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम यामुळे कलाकारांसाठीही झी मराठी अवॉर्ड्सचा अनुभव कायमच अविस्मरणीय ठरतो. यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्समध्ये मालिकांमधील आई एकत्र येऊन एक खास सरप्राईज परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या परफॉर्मन्समध्ये सहभागी झालेल्या मेघना एरंडे जोशी यांनी या अनुभवातील धमाल, पडद्यामागचे किस्से सांगितले.
मेघना एरंडे जोशी म्हणाल्या “झी मराठी अवॉर्ड्सचा अनुभव खूपच छान होता आणि आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. आमचा एक खास परफॉर्मन्स होता, ज्यामध्ये झी मराठीच्या मालिकांमधील सर्व आया एकत्र येऊन एक सरप्राईज अॅक्ट सादर करणार होत्या. 'सनई चौघडे' मधील पमा आणि तेजस्विनी, 'लक्ष्मी निवास'मधील लक्ष्मी, 'तारिणी'मधील कौशिकी, 'दीपज्योती' मधील सुलोचना, 'वीण दोघातली ही तुटेना' मधील मंदाकिनी आणि 'कृष्णाईच्या लेकी'मधील सत्यभामा, अशा आम्ही सात जणी या परफॉर्मन्समध्ये होतो.Zee Marathi meghna erande
सुहास परांजपे आणि मी आधीपासूनच मैत्रिणी आहोत. खरं तर आम्ही सगळ्याच एकमेकींच्या मैत्रिणी आहोत, पण याआधी कधी एकत्र डान्स परफॉर्मन्स केला नव्हता. सुहास, मी आणि हर्षदा ताई यांच्यात अॅक्टचं को-ऑर्डिनेशन होतं. आमचा परफॉर्मन्स दोन-तीन मिनिटांचा होता पण आम्ही त्यात खूप धमाल केली. आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन एकदा रिहर्सल केली, त्यानंतर आपापल्या सेटवर सराव केला आणि मग थेट टेक्निकल रिहर्सलच्या वेळी भेटलो. त्यानंतर वेगळी रिहर्सल झाली नाही. तरीही आमचा परफॉर्मन्स खूप छान झाला. तो सर्वोत्कृष्ट ठरला आणि आम्हाला वन्स मोअरही मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.Zee Marathi meghna erande
आम्ही सगळ्यांनी पारंपरिक लूक केला होता. मी इतक्या वर्षांनी नऊवारी साडी नेसली होती. त्या साडीला अंगावरच टाके घातले जातात, त्यामुळे ती सहसा सुटत नाही. एकदा टाके घातल्यानंतर चार-पाच तास साडी सोडता येत नाही, अशी परिस्थिती होती. त्यात दागिने सांभाळायचे होते. हे सगळं सांभाळत आमचा डान्स अप्रतिम झाला. या परफॉर्मन्समध्ये एक प्रसंगही घडला. सुहास, माझा आणि हर्षदा ताईचा भाग झाल्यानंतर पुढे कौशिकी आणि तेजस्विनीची एन्ट्री होणार होती. आम्ही स्टेजच्या बाजूला जात असताना माझं लक्ष स्टेजवर पडलेल्या फुटलेल्या बांगड्यांच्या काचांकडे गेलं. त्या तिथेच पडल्या होत्या. माझ्यावर डबींग मुळे इंग्लिश सिनेमांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्या क्षणी मला 'द मॅट्रिक्स' चित्रपटातील निओची आठवण झाली. तो ज्या वेगाने फाईट सीन करतो, त्याच वेगाने मी एका दमात त्या काचा उचलल्या आणि तिथून निघाले, कारण त्या दोघींचा परफॉर्मन्स सुरू झाला होता.Zee Marathi meghna erande
त्या काचांमुळे कोणालाही दुखापत झाली नाही, याचं मला खूप बरं वाटलं. आमचा परफॉर्मन्स छान झाल्याचा आनंद होताच पण कोणालाही दुखापत होण्याचा धोका टळला, याचंही समाधान वाटलं. आम्ही सगळ्याच जणी फिल्मी आहोत. त्यामुळे बॅकस्टेजला आम्ही आधी प्रार्थना केली. त्यानंतर 'चक दे!' चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे एकमेकींना म्हणत होतो, 'बस, वो 70 मिनिटं...' त्याऐवजी आमच्यासाठी ते 'बस, वो 5 मिनिटं... जब हमे स्टेजपर जाके परफॉर्म करना है!' हे सगळं बोलताना आम्ही हसत होतो, धमाल करत होतो, फोटो काढत होतो आणि रील्सही बनवत होतो. आम्ही सगळ्यांनी हा परफॉर्मन्स खूप एन्जॉय केला. आमच्या आनंदात प्रेक्षकही सहभागी झाले आणि त्यांनी आमचा परफॉर्मन्स उत्साहाने स्वीकारला, याचा खूप आनंद आहे. परफॉर्मन्सनंतर सगळे मला म्हणत होते की, मी खूप क्यूट दिसत होते. एकूणच, झी मराठी अवॉर्ड्स २०२६ हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय होता.”Zee Marathi meghna erande
झी मराठी अवॉर्ड्सचा मंच कलाकारांना त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळं काहीतरी सादर करण्याची संधी देतो. यंदा मालिकांमधील या आईंच्या एकत्रित परफॉर्मन्समधून प्रेक्षकांना सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. कलाकारांच्या पडद्यामागच्या गमतीजमती आणि रंगमंचावरील उत्साहामुळे या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे.
Zee Marathi meghna erande