'झी मराठी अवॉर्ड्स २०२६' मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज!

    30-Oct-2026
 
dance new
 
 
 
 
 
 मुंबई -Zee Marathi Zee Marathi Awards मालिकांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या परफॉर्मन्समध्ये प्रत्येक पात्राची खासियत आणि ताकद एका वेगळ्या रूपात सादर केली जाणार आहे. प्रत्येक खलनायकाला एका विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. या खास परफॉर्मन्समध्ये 'कृष्णाईच्या लेकी' मालिकेतील इंदुराणी, 'दीपज्योती' मालिकेतील प्रीती, 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंत', 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील भैरवी आणि 'कमळी' मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत.
 
 
'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव सांगतो, “हा परफॉर्मन्स माझ्यासाठी एकदम वेगळा अनुभव होता! मी याआधी कधीही असं काही केलं नव्हतं. आम्ही सुरुवातीला रिहर्सल केल्या. आमचे कोरिओग्राफर यांनी हा परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने तयार केला. त्यांनी मला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे अनुष्काला 'व्हॅम्पायर डायरीज' ही मालिका खूप आवडते. जेव्हा मी तिला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायर बनणार आहे, तेव्हा ती माझ्यापेक्षाही जास्त उत्सुक झाली होती. आम्ही या परफॉर्मन्ससाठी थोडा सराव केला होता. पण प्रत्यक्ष परफॉर्मन्सच्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो, कारण मी काही नैसर्गिकरीत्या उत्तम डान्स करणारा कलाकार नाही. जेव्हा मला सांगितलं की, हा परफॉर्मन्स थेट प्रेक्षकांसमोर होणार आहे, तेव्हापासून माझ्या काही रात्री झोपेशिवाय गेल्या. कारण प्रेक्षकांसमोर डान्स करणं हा माझ्यासाठी अगदी नवीन अनुभव होता आणि त्यामुळे जबाबदारीही मोठी होती. काही तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या अडचणींमुळे आम्हाला हा परफॉर्मन्स आधीच शूट करावा लागला. पण रात्रभर शूटिंग करूनही, फक्त तीन तासांची झोप घेऊन मी परफॉर्मन्ससाठी आलो. माझं संपूर्ण लक्ष परफॉर्मन्सवर होतं. शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन केलं होतं आणि देवाच्या कृपेने ते छान जमलं. आता हा परफॉर्मन्स टीव्हीवर कधी पाहायला मिळतो, याची मला उत्सुकता आहे.”Zee Marathi Zee Marathi Awards
 
'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत इंदुराणीची भूमिका साकारणारी साक्षी गांधी सांगते, “मी लहानपणापासून झी मराठी बघत आले आहे. कधी वाटलंही नव्हतं की, आपण एखादी मालिका करू. याआधी मी झी मराठीवर कॅमिओ केला आहे. पण यावर्षी मी झी मराठीवर मुख्य खलनायिकेची भूमिका साकारतेय. बऱ्याचदा हे सगळं स्वप्नवत वाटतं. पण हे सगळं मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत असतं. हे माझं झी मराठी अवॉर्ड्सचं पहिलं वर्ष आहे. आम्ही खूप मज्जा केली. माझा डान्ससुद्धा होता. अशा कार्यक्रमांमध्ये सगळे कलाकार एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे हा आपल्या घरातल्याच सोहळ्यासारखा वाटतो. संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. धमाल, मज्जा आणि मस्ती असते. कोणाला पुरस्कार मिळेल, याची उत्सुकता असते. अशा अनेक गोष्टींमुळे हा सोहळा परिपूर्ण होतो. तुम्हालाही हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे.”
 
Zee Marathi Zee Marathi Awards खलनायकांच्या अनोख्या रूपांची झलक, दमदार नृत्य आणि कलाकारांची धमाल यामुळे झी मराठी अवॉर्ड्स २०२६ चा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.Zee Marathi Zee Marathi Awards
 




संबंधित मजकूर