'झी मराठी अवॉर्ड्स २०२६' आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष!

    30-Oct-2026
zee awards
 
मुंबई -zee marathi award प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एक नवं आव्हान समोर येतं. मात्र, आपल्या माणसांची साथ, स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर हीच आव्हानं यशाचा मार्ग दाखवतात. याच भावनेतून यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ ची संकल्पना आहे ‘चॅलेंज' . ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या भावनेतून साकार होणारा हा सोहळा. या खास सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मनोरंजन, नृत्य, धमाल आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेस!
 
सोहळ्याची सुरुवात होणार कलाकारांच्या दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्रीने! आपल्या आवडत्या मालिकांमधील कलाकार त्यांच्या खास आणि हटके पोशाखांतून लक्ष वेधून घेतील. प्रत्येक पोशाखात दिसणारी वेगळी कल्पना, आणि आकर्षक लूक रेड कार्पेटची रंगत वाढवतील. एवढंच नाही, तर मालिकांमधील कलाकार एकमेकांना देणार आव्हान! त्यामुळे कोणत्या मालिकेतील कलाकार बाजी मारणार आणि कोण ठरणार सर्वांत सरस, याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. यानंतर रंगणार प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेस! कमळी–ऋषी, सावली–सारंग, जान्हवी–विश्वा, भावना–सिद्धू, जय–शरू, तारिणी–केदार, समर–स्वानंदी, दीप - ज्योती आणि गौरी–शंकर या जोड्या आपल्या नृत्यातून प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गोडवा उलगडणार आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीसोबतच नृत्याची जुगलबंदीही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.zee marathi award
 
झी मराठीच्या दमदार स्त्री व्यक्तिरेखा मंगळागौरीच्या पारंपरिक रंगात रंगणार आहेत. उत्साहाने भरलेल्या या सादरीकरणात मात्र अचानक एक अनपेक्षित आव्हान येणार आहे. त्यामुळे या धमाल परफॉर्मन्समध्ये पुढे काय घडणार, हे पाहणं मनोरंजक ठरेल. खलनायकांच्या खास सादरीकरणात प्रत्येक व्यक्तिरेखेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. त्यांच्या हटके अंदाजातून रंगणारा हा परफॉर्मन्स मनोरंजनात वेगळीच रंगत आणणार आहे.नायिकांच्या खास सादरीकरणातून कल्पनारम्य दुनिया उलगडणार आहे. तर नायकांच्या सादरीकरणात मुलांची उडणारी तारांबळ आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवेल.zee marathi award
 
झी मराठीच्या संपूर्ण परिवारासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण म्हणजे झी मराठी अवॉर्डच्या मंचावर पहिल्यांदाच BSF मध्ये देशसेवा करणाऱ्या, खऱ्या आयुष्यातील ‘तारिणी’ BSF जवान 'कल्याणी' ह्यांना झी मराठीच्या मंचावर आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला . देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कल्याणी ह्यांना ‘मानाची पैठणी’ आणि दिवाळीचा फराळ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. झी मराठीच्या सर्व नायिका आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, हर्षदा खानविलकर यांनी एकत्र येत त्यांचा सन्मान केला. देशासाठी सेवा बजावणाऱ्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक खास क्षण होता. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. आपल्या देशासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या जवानाचा सन्मान करण्याची संधी मिळणे, ही झी मराठी परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती.zee marathi award
 
अशा अनेक खास क्षणांनी सजलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा केवळ पुरस्कारांचा सोहळा नसून आव्हानांवर मात करणाऱ्या कलाकारांच्या जिद्दीचा, नात्यांच्या साथीचा आणि यशाचा उत्सव ठरणार आहे.  zee marathi award




संबंधित मजकूर