पहिलं रेड कार्पेट, पहिलं अवॉर्ड फंक्शन अन् मोठ्या मंचावर नृत्याची संधी, चिन्मयी मोरेचा अविस्मरणीय अनुभव!

    30-Oct-2026

more
 
 
 
 
मुंबई -Chinmayee More Zee Marathi ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत ‘राधिका’ ही भूमिका साकारणारी चिन्मयी मोरे हिच्यासाठी झी मराठी अवॉर्ड्स २०२६ हा अनुभव अनेक अर्थांनी खास ठरला. झी मराठीच्या कुटुंबात नव्याने सामील झालेल्या चिन्मयीसाठी हा पहिलाच अवॉर्ड सोहळा, पहिलाच रेड कार्पेट आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच नृत्य सादर करण्याची संधी होती. चित्रपटांमध्ये हिरोईनच्या मागे डान्सर्सचा ग्रुप असताना पाहून कधीतरी असाच अनुभव आपल्यालाही घेता यावा, असं वाटणाऱ्या चिन्मयीला यंदा झी मराठी अवॉर्ड्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्ष जगता आलं.
 
आपल्या या अनुभवाबद्दल आणि अवॉर्ड सोहळ्याने दिलेल्या सुंदर आठवणींबद्दल चिन्मयी मोरे सांगते, "खरं तर, आपण प्रत्येकानेच कधी ना कधी चित्रपटांमध्ये पाहिलेलं असतं… एखादं सुंदर गाणं सुरू असतं, हिरोईन स्टेजवर नाचत असते आणि तिच्या मागे अनेक डान्सर्स तिच्यासोबत ताल धरत असतात, ते पाहताना कधीतरी आपल्यालाही असं काहीतरी अनुभवायला मिळावं, असं मनापासून वाटतं! माझ्यासाठी तो क्षण प्रत्यक्षात जगणं म्हणजे जणू एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. खरं सांगायचं तर, ही संधी मला मिळेल आणि मी हे सगळं करू शकेन, असा विचारसुद्धा कधी केला नव्हता. स्टेजवर गाणं सुरू आहे, समोर प्रेक्षक आहेत आणि माझ्या पाठीमागे डान्सर्सचा ग्रुप, तो संपूर्ण अनुभवच काहीतरी वेगळा होता! शब्दांत व्यक्त न करता येणारी भावना. आयुष्यभर लक्षात राहणारा, अविस्मरणीय क्षण! हे माझं पहिलंच अवॉर्ड फंक्शन आणि त्यातही एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच केलेला असा डान्स! शाळेत असताना छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना कधी वाटलंच नव्हतं की एक दिवस इतक्या मोठ्या व्यासपीठावर नृत्य करण्याची संधी मिळेल. आयुष्य आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या रूपात आपली स्वप्नं जगण्याची संधी देईल, हे खरंच सांगता येत नाही! या सुंदर अनुभवासाठी आणि माझ्या आयुष्यात हा अविस्मरणीय क्षण जोडल्याबद्दल मनापासून धन्यवाद, झी मराठी! आणि माझ्या ‘धाकट्या सूनबाई’च्या संपूर्ण टीमचेही खूप खूप आभार!Chinmayee More Zee Marathi
 
माझ्या भूमिकेच्या स्वभावानुसार मी तयार झाले होते. मनात एक वेगळीच उत्सुकता होती, तो क्षण अनुभवण्याची, तयार होऊन मीडियासमोर जाण्याची आणि आयुष्यात पहिल्यांदाच रेड कार्पेटवर चालण्याची! शूटिंग संपवून तिथे पोहोचले आणि त्यानंतर सुरू झाला एक सुंदर अनुभव. काही अनुभव आपल्याला फक्त आनंद देत नाहीत, तर आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या आणखी जवळ घेऊन जातात आणि हा अनुभव माझ्यासाठी अगदी तसाच असल्याचं चिन्मयी म्हणाली.Chinmayee More Zee Marathi




संबंधित मजकूर