मुंबई (Bombay Coated IPO 2026) : बॉम्बे कोटेड अँड स्पेशल स्टील्स लिमिटेडने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसाठी (IPO) प्रति समभाग ७८ ते ८२ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. कंपनीचा आयपीओ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून, सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद होणार आहे. (Bombay Coated IPO 2026)
किमान १८२ समभागांसाठी बोली लावता येणार
या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना किमान १८२ समभागांसाठी बोली लावता येईल. त्यानंतर १८२ समभागांच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. निश्चित केलेल्या किंमतपट्ट्यानुसार, किमान लॉटसाठी गुंतवणूकदारांना १४,१९६ ते १४,९२४ रुपयांची बोली लावावी लागेल. (Bombay Coated IPO 2026)
एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होणार समभाग
या आयपीओसाठी स्मार्ट हॉरिझॉन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडे आयपीओच्या रजिस्ट्रारची जबाबदारी आहे.
आयपीओ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजार (BSE) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. (Bombay Coated IPO 2026)