टायकुन्स गोल्ड एव्हेन्यू प्रकरणी अखेर विकासक श्रीकांत शितोळे समोर, व्हिडीओ जारी करत सर्व आरोप फेटाळले

    03-Oct-2026
 
Tycoons Gold Avenue Shrikant Shitole
 
ठाणे (Tycoons Gold Avenue Shrikant Shitole) : सध्या कल्याणात प्रचंड गाजत असणारे आणि शेकडो नागरिकांच्या भवीतवयाचा प्रश्न असणारे टायकुन्स प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे..गोल्ड एव्हेन्यू पुनर्विकास प्रकल्पात एका ग्राहकाने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर विकासक श्रीकांत शितोळे यांनी व्हिडिओ जारी करत आपली भूमिका मांडली आहे.गेल्या काही दिवसांपासून शितोळे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना टायकुन्स समूहाने प्रसिद्धी पत्रक काढून आरोपांवर प्रत्युत्तर दिले होते. मात्र आता अनेक उलट सुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर खुद्द अखेर श्रीकांत शितोळे यांना समोर येऊन आपले म्हणणे मांडावे लागले.
 
त्यांनी सोशल मीडियावर एक व्हीडीओ प्रसारित करून आपली भूमीका स्पष्ट केली आहे.. व्हीडीओमध्ये शितोळे यांनी १७७ कोटींच्या घोटाळ्याचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झाला नसून समूह या सर्व आरोपांचे खंडन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. (Tycoons Gold Avenue Shrikant Shitole)
 
तसेच या प्रकरणामागे त्यांचे कौटुंबिक विरोधक गिरीश पवार व त्यांचे हस्तक असल्याचा आरोप करत, ते जाणीवपूर्वक हा प्रकल्प अडचणीत आणून समूहाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून ही सूडभावना आहे, असा दावा त्यांनी केला.केंद्र शासनाकडून वित्त मंजुरी झाली असून लवकरच फंड येऊन हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल, असे आश्वासन देत ग्राहकांनी सहकार्य करावे आणि चुकीच्या मार्गाने प्रकल्प अडचणीत आणू नये, अशी नम्र विनंती शितोळे यांनी केली आहे.
 
"माझी सर्व ग्राहकांना, सदनिकाधारकांना अपील आहे की त्यांनी अशा चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये. विकासात अडचणी आल्या आणि विकासकांवर कारवाई झाली तर पुढील प्रकल्प अडचणीत येऊन सर्वांना बाधा होऊ शकते," -श्रीकांत शितोळे,विकासक (Tycoons Gold Avenue Shrikant Shitole)
 
 




संबंधित मजकूर