कोलाड-पुणे मार्गावरील झाडावर दुर्मीळ गिधाडांचा मुक्काम

    03-Oct-2026
rare vulture
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी परिसरात एकाच झाडावर आठ भारतीय गिधाड (लांब चोचीचे गिधाड) बसलेली आढळून आली (rare vulture). सुतारवाडी ते कुडली गावादरम्यान कोलाड-पुणे मार्गावर ही निरीक्षण नोंद करण्यात आली (rare vulture). नामशेष होण्याच्या धोक्याचा सामना करणाऱ्या या गिधाडांचे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने दर्शन घडल्याने रायगडमधील गिधाडांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने या नोंदीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (rare vulture)
 
 
सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते एका वन्यजीव बचाव मोहिमेनिमित्त सुतारवाडी परिसरात गेले असता त्यांना या गिधाडांचे दर्शन झाले. एका झाडावर आठ गिधाडे बसलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गिधाडांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप, अन्नाची उपलब्धता आणि पशुवैद्यकीय औषधांमुळे निर्माण झालेले धोके या पार्श्वभूमीवर ही नोंद लक्षवेधी ठरते. भारतीय गिधाड अर्थात लांब चोचीचे गिधाड (Gyps indicus) ही भारतीय उपखंडात आढळणारी गिधाडांची प्रजाती आहे. मृत जनावरांचे मांस खाऊन पर्यावरणातील जैविक कचऱ्याचे विघटन करण्यामध्ये गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासह रोगांचा प्रसार नियंत्रित करण्यासही त्यांची मदत होते. मात्र, गेल्या काही दशकांत गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
 
 
रायगड जिल्ह्याचा विचार करता गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने चिरगाव हे गाव विशेष महत्त्वाचे आहे. चिरगावमध्ये स्थानिक नागरिक आणि संवर्धन संस्थांच्या प्रयत्नांमुळे गिधाडांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. सह्याद्रीच्या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या नोंदीमुळे रायगडमधील गिधाडांच्या अधिवासाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. गिधाडांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सुरक्षित खाद्यस्रोत, विषारी औषधांपासून संरक्षण आणि त्यांच्या विश्रांती व प्रजनन स्थळांचे जतन करणे आवश्यक आहे.




संबंधित मजकूर