मुंबई (Goa Minor Sexual Assault Case) : गोवा पोलिसांच्या वेरणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. मोरमुगाव येथील अवघ्या १६ वर्षांच्या एका हिंदू अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव आणल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी २१ वर्षीय धर्मांध जिहाद्यास अटक केली आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप केला की, आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला सोलापूर आणि पुढे कर्नाटकातील होसपेट येथे नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच ठेवत धर्मांतरासाठी दबाव आणला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरमुगाव येथून पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. संशयित आरोपीने तिचे अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देत तिला आधी सोलापूर आणि नंतर कर्नाटकातील होसपेट येथे पळवून नेले. तेथे तिला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात या नरकयातनांदरम्यान ती चार वेळा गर्भवती राहिल्याचे तिने स्पष्ट केले. जेव्हा आरोपी कामावर जायचा, तेव्हा या निष्पाप मुलीला खोलीत बाहेरून कुलूप लावून बंदिस्त केले जायचे. आरोपीच्या आई आणि बहिणीनेही या गुन्ह्यात त्याला साथ देत 'मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत दोन वर्षे तिला लपवून ठेव आणि मग लग्न कर' असा अजब सल्ला दिल्याचा भीषण आरोप समोर आला आहे. (Goa Minor Sexual Assault Case)
पीडित मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ एवढ्यावरच थांबला नाही, तर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने अत्यंत क्रूर पद्धतीने दबाव आणला गेला. पीडितेला कपाळावर बिंदी किंवा कुंकू लावण्यास सक्त मनाई करण्यात आली. तिला काळ्या ओढणीने चेहरा झाकण्यास भाग पाडले गेले. मुलीला मंदिरात जाण्यापासून आणि हिंदू धार्मिक विधी करण्यापासून रोखण्यात आले. 'प्रार्थना करायची असेल तर केवळ मशिदीत जा,' अशी सक्ती तिच्यावर केली गेली. पीडितेने खोलीत पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि देवी काली यांची छोटी चित्रे आणली असता, आरोपीने संतापाच्या भरात देवी लक्ष्मीचे छायाचित्र जाळून टाकल्याचा धक्कादायक आरोप मुलीने केला आहे. मुलीला एका दर्ग्यात नेऊन दोन दिवस ठेवण्यात आले आणि तिच्या गळ्यात ताईत (ताबीज) बांधण्यात आले, अशी माहिती आहे. (Goa Minor Sexual Assault Case)
आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने या अल्पवयीन मुलीची खरी ओळख लपवण्यासाठी तिचे नाव बदलून एक बनावट आधारकार्ड तयार केले होते. पीडितेने मोठ्या धैर्याने एक मोपाईल फोन मिळवला. तिने आपल्या भावाच्या मित्राच्या साहाय्याने थेट गोव्याच्या वेरणा पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी चक्र फिरवून तपासाची सूत्रे हालवली आणि मुलीची सुखरूप सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
सध्या गोवा पोलीस लैंगिक अत्याचार, अपहरण, धर्मांतराचा दबाव, बेकायदेशीर डांबून ठेवणे आणि बनावट ओळखपत्र तयार करणे अशा सर्व गंभीर कोनांतून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत पुढील कडक कारवाई सुरू आहे. (Goa Minor Sexual Assault Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक