मुंबई (CJP protest Abhijit Dipke's statement) : अभिजित दिपके यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे.पंडित नेहरूंनी डॉ आंबेडकरांना पुढे आणले असे विधान अभिजित दिपके यांनी केले असून त्यांच्या या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे संपूर्ण देशाला पुढे आणले आहे. इतिहास विसरून चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या डोक्यात हवा शिरली आहे.ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे अनादर करणारे वक्तव्य करीत आहेत.त्यांनी बेताल वक्तव्य बंद करावीत नाहीतर रिपब्लिकन पक्ष अभिजित दिपके विरुद्ध कडक पाऊल उचलेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत बांद्रा येथे पत्रकारांशी बोलताना दिला. (CJP protest Abhijit Dipke's statement)
काही विद्यार्थी तरुण अभिजित दीपके यांना पाठिंबा देत आहेत. ही चांगली बाब आहे. तरुणांच्या पाठिंब्याचा सदुपयोग करावा.वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या डोक्यात जास्त जावा शिरली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे वक्तव्य करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. दिपके यांनी चुकीचे बोलणे टाळावे;महनीय व्यक्तींवर ;लोकशाहीत बहुमताने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर बेछूट टीका करताना बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावित अन्यथा रिपब्लिकन पक्ष कडक भूमिका घेऊन त्यांना अस्मानातून जमिनीवर आणेल असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला आहे.अभिजित दिपके आता महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर आणि राज्यात फिरत आहेत.त्यांनी रस्ते विकास पहिला आहे.त्यामुळे प्रधानमंत्री मोदींबद्दल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चुकीचे अवमानकारका बोलणे अभिजित दिपके यांनी करू नये. अभिजित दिपके यांनी आपल्या चुकीचे वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे.असे ना. रामदास आठवले म्हणाले. (CJP protest Abhijit Dipke's statement)