मुंबई (Be Cyber Street Smart Campaign ) : शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती हीच प्रभावी ‘फायरवॉल’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती महिना २०२६ अंतर्गत देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने होणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यात येणार आहे. (Be Cyber Street Smart Campaign )
The Ring the Bell ceremony at BSE marked the launch of Cybersecurity Awareness Month 2026 by the Data Security Council of India. As AI and technology reshape our digital lives, staying cyber safe is everyone’s responsibility.
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "निवृत्तिवेतनधारक, गुंतवणूकदार, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल उपकरणे वापरणाऱ्या माता तसेच ई-स्पोर्ट्स खेळाडू अशा प्रत्येक घटकाने ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत सोपे आणि व्यवहार्य सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल. ‘कठपुतळी’ ही संकल्पना सायबर संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडते. ही मोहीम देशातील सर्वांत व्यापक सायबर जनजागृती मोहिमांपैकी एक ठरेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Be Cyber Street Smart Campaign )
नागरिकांचा सजग सहभाग आवश्यक
"सायबर क्षेत्रातील सामूहिक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासन उद्योग क्षेत्रासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांचा सजग सहभागही तितकाच आवश्यक आहे," असेही त्यांनी सांगितले. (Be Cyber Street Smart Campaign )
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....