नाबार्ड: सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६ चे आयोजन

सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६ हा २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत “समृद्धीसाठी प्रामाणिकता” (Probity for Prosperity) या संकल्पनेअंतर्गत साजरा करण्यात येत आहे.

    29-Oct-2026

NABARD Vigilance Awareness Week 2026
 
मुंबई, :  (NABARD Vigilance Awareness Week 2026)सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६ च्या निमित्ताने नाबार्डतर्फे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथे वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. नाबार्डचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री जी. एस. रावत, उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. सूद आणि मुख्य सतर्कता अधिकारी श्री यू. दिनेश शनभाग यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकथॉनला सुरुवात केली. या उपक्रमात १,००० हून अधिक सहभागी उत्साहाने सहभागी झाले. सहभागींच्या हातातील फलकांवरील घोषवाक्यांद्वारे “समृद्धीसाठी प्रामाणिकता” हा संदेश प्रसारित करण्यात आला.
 
नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्मचाऱ्यांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. यावेळी भारताच्या माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसेच भारत सरकारच्या केंद्रीय दक्षता आयोगाचे संदेश वरिष्ठ अधिकारी आणि नाबार्डचे मुख्य सतर्कता अधिकारी श्री यू. दिनेश शनभाग यांनी वाचून दाखवले.
 
नाबार्डने लखनऊ येथील नॅशनल बँक स्टाफ कॉलेजच्या सहकार्याने देशव्यापी मुक्त ऑनलाइन अभ्यासक्रमांचे (MOOCs) आयोजन केले. या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (IT), सायबर सुरक्षा आणि सायबर स्वच्छता, सार्वजनिक खरेदी तसेच गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ऑनलाइन सत्रे आयोजित करण्यात आली. संस्थेमध्ये जागरूकता वाढवणे आणि सत्यनिष्ठेची संस्कृती रुजवणे हा या उपक्रमांचा उद्देश होता.(NABARD Vigilance Awareness Week 2026)
 
नाबार्डचे प्रधान कार्यालय, प्रादेशिक कार्यालये (ROs) आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये (TEs) घोषवाक्य लेखन, उत्स्फूर्त वक्तृत्व, प्रतिभा शोध, विषयाधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या विषयावर सक्रिय सहभाग नोंदवण्याची आणि सर्जनशील अभिव्यक्तीची संधी मिळाली.
 
१७ ऑगस्ट २०२६ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सतर्कता मोहिमेदरम्यान नाबार्डने सतर्कता तक्रार व्यवस्थापन प्रणाली (VCMS) पोर्टल देखील सुरू केले.
 
प्रतिबंधात्मक सतर्कतेविषयी जागरूकता अधिक दृढ करण्यासाठी नाबार्डने विविध जनजागृती उपक्रम राबवले. यामध्ये देशभरातील ग्रामसभांचे आयोजन तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परिसंवाद व कार्यशाळांचा समावेश होता. समाजातील विविध घटकांमध्ये प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नैतिक आचरणाची संस्कृती वाढवणे हा या उपक्रमांचा उद्देश होता.
 
सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६ मधील उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. याशिवाय, देशभरातील नाबार्डच्या कर्मचाऱ्यांना एसएमएस संदेश पाठवून व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनात सतर्कता आणि सत्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.(NABARD Vigilance Awareness Week 2026)
 




संबंधित मजकूर