विक्रोळीत १२ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार! जिहादी फवाद खानला अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

    28-Oct-2026   
 
Vikhroli POCSO Case
 
मुंबई (Vikhroli POCSO Case) : विक्रोळीच्या टागोर नगर येथील एका खासगी कोचिंग क्लासमधील जिहादी मुस्लिम शिक्षकाने १२ वर्षांच्या, पाचवीत शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी शिक्षक फवाद खान यास बेड्या ठोकल्या आहेत.
 
अशी माहिती आहे की, विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस येऊन आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित क्लास सुरूच ठेवण्यात आला होता. यामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला. त्यानंतर हिंदू रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित क्लास बंद केला. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी हिंदू रक्षा समितीची ठाम मागणी आहे. (Vikhroli POCSO Case)
 
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रात्रीच विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकरणाची गंभीर दखल घेण्यास सांगितले आणि आरोपीवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, क्लासेस चालकावरही कायदेशीर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. आरोपी फवाद खान विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
 
दोषींवर कठोर कारवाई करावी
 
विक्रोळीतील टागोर नगर ६ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याच प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हिंदू पालकांनी आपल्या मुलांना क्लास निवडताना शिक्षकांची पार्श्वभूमी व संस्थेची विश्वासार्हता तपासावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करून आवश्यकतेनुसार त्यांचे परवाने रद्द करावेत. असल्या जिहादी मानसिकतेच्या मुलांचे हे प्रकार विक्रोळीत वाढत आहेत. पोलिसांनी मॉरल पोलिसिंग करून संस्थेची मदत घेऊन मुलींमधे जागरूकता वाढवावी. - देवेंद्र प्रल्हाद डोके, सामाजिक कार्यकर्ते (Vikhroli POCSO Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर