मुंबई (Vaishali Samant Ramayana) : महाकाव्य रामायणातील श्रीराम आणि माता सीता यांच्या प्रेमाची भावस्पर्शी अनुभूती देणारं 'मंगल रंग' या गाण्याच्या तेलुगू आवृत्तीला मराठी गायक वैशाली सामंत हिनं आपला आवाज दिला आहे. ए. आर. रहमान यांचं संगीत लाभलेल्या या गाण्याच्या माध्यमातून तेलुगू भाषिक प्रेक्षकांपर्यंत राम आणि सीतेच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाच्या भावना पोहोचवल्या आहेत.
'मंगल रंग' हे गाणं हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आलं. हिंदी आवृत्ती अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायली असून, तेलुगू आवृत्ती वैशाली सामंत यांच्या आवाजात आहे. चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे.(Vaishali Samant Ramayana)
या गाण्याची तेलुगू आवृत्ती वैशाली सामंत आणि राघव कौशिक यांनी गायली असून, त्याचे गीत राकेंदू मौली यांनी लिहिले आहे. या दिव्य प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल वैशाली सामंत यांनी आपला प्रचंड आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
(Vaishali Samant Ramayana)
या दृश्यांमध्ये रणबीर कपूर भगवान श्रीरामांच्या भूमिकेत आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्या स्वयंवरापासून ते लग्नापर्यंतचे सुंदर आणि भव्य क्षण चित्रित केले आहेत.(Vaishali Samant Ramayana)
रामायणातील हे अप्रतिम गाणे अनेक प्रतिभावान व्यक्तींच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे हिंदी गीत डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहे. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी हिंदी आवृत्तीला आपला सुमधुर आवाज दिला आहे.(Vaishali Samant Ramayana)