मुंबई - Sharvari Ahaan Pandayयशराज फिल्म्सने आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव ‘बेपरवाह’ असे आहे. अहान पांडे आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या रोमँटिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत, तर आदित्य चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत.
चित्रपटाचे शीर्षक टीझर पोस्टरसह जाहीर करण्यात आले. चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनाला आता नेमके पाच महिने शिल्लक आहेत. ‘सैयारा’मुळे चर्चेत आलेला अहान पांडे आणि शर्वरी हे दोघेही ‘बेपरवाह’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.Sharvari Ahaan Panday
अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बेपरवाह’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते यशराज फिल्म्समध्ये पुनरागमन करत आहेत. यापूर्वी त्यांनी या बॅनरसाठी ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.Sharvari Ahaan Panday
आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेला ‘बेपरवाह’ हा चित्रपट 26 मार्च 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.Sharvari Ahaan Panday