मुंबई (विशेष प्रतिनिधी) - Prabhas Fauji subodh bhave नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी आगामी 'फौजी' चित्रपटाच्या दिग्दर्शकावर टीका केली आहे. चित्रपटात नेताजी आणि ॲडॉल्फ हिटलर यांच्या भेटीचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, दिग्दर्शकाने राष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही केली आहे.
आयएएनएसशी बोलताना चंद्र कुमार बोस म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्याचे नेते पडद्यावर दाखवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली ऐतिहासिक तथ्यांमध्ये फेरफार करता कामा नये.Prabhas Fauji subodh bhave
ते म्हणाले, 'माझ्या मते, राष्ट्रीय प्रतीकांशी संबंधित तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडणे आणि कल्पनेचा आधार घेणे हा गुन्हा आहे.' त्यांनी असा आरोप केला की, चित्रपटात नेताजी आणि हिटलर यांची भेट चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिष्ठा कमी होते.Prabhas Fauji subodh bhave
नेताजी आणि हिटलर यांच्या भेटीच्या ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलताना चंद्रकुमार बोस म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी नेताजी हिटलरला भेटले होते. ते म्हणाले, "नेताजींचा विश्वास होता की, जर्मनीचा हिटलर आणि जपानचा हिदेकी तोजो त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देऊ शकतील." ते म्हणाले की, नेताजी फॅसिझमचे कट्टर विरोधक होते आणि लोकशाही व लोकांच्या लोकशाही हक्कांवर त्यांचा विश्वास होता.Prabhas Fauji subodh bhave