'चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव' 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान रंगणार!महोत्सवातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांना देणार!

    27-Oct-2026

film
 
 
मुंबई ( विशेष प्रतिनिधी )- Ashish Shelar मराठी चित्रपटसृष्टीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’चे दुसरे पर्व 15 ते 18 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणार आहे. यंदाच्या महोत्सवात एकूण 41 मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून, परिसंवाद, विशेष मुलाखती, मास्टरक्लासेस, लघुपट स्पर्धा आणि ‘पुस्तक ते सिनेमा’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महोत्सवातून मिळणारा महसूल राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी चित्रपटांना केवळ चित्रपटगृहे आणि पुरस्कारांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देणे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील आशयसमृद्ध आणि प्रयोगशील कलाकृतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.Ashish Shelar
यंदाच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महोत्सवाच्या आयोजनातून संकलित होणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.Ashish Shelar
यंदाच्या महोत्सवात एकूण 41 मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये 5 जुन्या अभिजात मराठी चित्रपटांचा समावेश असून, उर्वरित 36 चित्रपटांमध्ये नवीन, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेले, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले, प्रयोगशील तसेच अद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट असतील. महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी प्रतिव्यक्ती नोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. या शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारणाच्या कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येईल.Ashish Shelar
सामाजिक प्रश्न, ऐतिहासिक विषय, ग्रामीण आणि शहरी जीवन, स्त्रीकेंद्री अनुभव, समकालीन आव्हाने आणि मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट या महोत्सवात सादर केले जाणार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य, कलात्मक सामर्थ्य आणि वेगवेगळ्या पिढ्यांमधील चित्रपटकर्त्यांचे योगदान प्रेक्षकांसमोर येणार आहे.Ashish Shelar
 




संबंधित मजकूर