एमएमआरच्या पुढील ४० वर्षांच्या पाण्याचे नियोजन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    26-Oct-2026
 
MMR Water Supply Planning
 
मुंबई(MMR Water Supply Planning): मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील विकासाची गरज लक्षात घेऊन पुढील ४० वर्षांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  (MMR Water Supply Planning)
 
पोशीर आणि शिलार या प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील विविध भागांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.  (MMR Water Supply Planning)
 
न्यायालयाचा निर्णय अनुकूल झाल्याने रखडलेल्या कोंढाणे प्रकल्पाचे कामही वेगाने करण्यात येणार आहे. एमएमआरची भविष्यातील पाण्याची गरज आणि त्यासाठी आवश्यक प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या गटाचे सादरीकरण लवकरच होणार असून, त्याला मान्यता देऊन दीर्घकालीन पाणी नियोजन केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  (MMR Water Supply Planning)
 
कर्जतच्या वृक्षतोडीवरून फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार
 
कर्जत येथील पंप स्टोरेज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून सुरू असलेला विरोध हा ‘फेक नरेटिव्ह’ असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा तीन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाचा असून, कंपनीने वन विभागाला प्रकल्पाच्या क्षेत्राच्या तिप्पट जमीन दिली आहे. या जमिनीवर ९० हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  (MMR Water Supply Planning)
 
सौरऊर्जेची निर्मिती कमी होणाऱ्या कमाल मागणीच्या चार तासांत कोळशावर आधारित वीजनिर्मिती करण्याऐवजी पंप स्टोरेजच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कोळशावर आधारित वीजनिर्मितीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास या प्रकल्पाची मदत होईल, असा दावा फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होणार असून, स्थानिकांना त्याचा लाभ मिळायला हवा. मात्र, खोटे कथन करून राज्यात येणारी हरित ऊर्जा रोखण्याचा प्रयत्न करणे हे महाराष्ट्रविरोधी असल्याचे ते म्हणाले. (MMR Water Supply Planning)
 
 




संबंधित मजकूर