बर्लिनमध्ये पीयूष गोयल यांची उद्योगपतींशी महत्त्वपूर्ण चर्चा; भारत-जर्मनी व्यापार-गुंतवणुकीला नवी दिशा!

 
Piyush Goyal Germany Visit
 
मुंबई (Piyush Goyal Germany Visit) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बर्लिनमधील दोन दिवसांचा जर्मनीचा अधिकृत दौरा पूर्ण केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जर्मन सरकारचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख उद्योगपती, संशोधन संस्थांचे प्रतिनिधी आणि भारतीय समुदायातील सदस्यांशी विविध बैठका घेतल्या. व्यापार, गुंतवणूक, प्रगत उत्पादन, संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांत भारत-जर्मनी सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकांमध्ये भर देण्यात आला.
 
गोयल यांनी जर्मन फेडरल चॅन्सेलरीचे आर्थिक व वित्तीय धोरण सल्लागार आणि जी ७, जी२०  शेर्पा लेव्हिन हॉले यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध दृढ करणे आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी शोधणे यावर विचारविनिमय झाला. (Piyush Goyal Germany Visit)
 
याशिवाय, सिमेन्स हेल्थिनियर्सचे सीईओ बर्न्ड मोन्ताग, बर्टल्समन इन्व्हेस्टमेंट्सचे सीईओ कार्सटेन कोसफिल्ड, तसेच फॉक्सवॅगनचे सीएफओ आणि स्कोडा ऑटोचे सीईओ होल्गर पीटर्स यांच्याशी गोयल यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. या चर्चांमध्ये औद्योगिक सहकार्य, व्यावसायिक भागीदारी आणि भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेण्यात आला. (Piyush Goyal Germany Visit)
 
प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी त्यांनी जर्मनीतील प्रमुख औद्योगिक संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींसोबत गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळानेही जर्मन उद्योग प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील संघटनांसोबत चर्चा करून द्विपक्षीय व्यापार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधींचा शोध घेतला.
 
संशोधन आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या अनुषंगाने गोयल यांनी जर्मनीतील भारतीय संशोधक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच फ्राउनहोफर संशोधन संस्थांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, औद्योगिक नवोन्मेष आणि बॅटरी तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा झाली. संशोधन आणि उद्योग-शैक्षणिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवरही विचार करण्यात आला. (Piyush Goyal Germany Visit)
 
दौऱ्यादरम्यान गोयल यांनी बर्लिनमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि प्रसारमाध्यमांनाही संबोधित केले. या दौऱ्यामुळे व्यापार, गुंतवणूक, प्रगत उत्पादन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रांतील भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला अधिक चालना देण्याच्या संधी अधोरेखित झाल्या. (Piyush Goyal Germany Visit)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर