"सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तसुभरही तडा देणार नाही"; सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आ. प्रवीण दरेकरांची ग्वाही!

    25-Oct-2026
 Pravin Darekar Cooperative Housing Societies
 
 मुंबई (Pravin Darekar Cooperative Housing Societies) : मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला आहे त्या मुंबईकरांच्या आणि सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विश्वासाला आम्ही तसुभरही तडा देणार नाही, अशी ग्वाही मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. सहकार पॅनेलतर्फे मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहीर मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आ. दरेकर बोलत होते.
 
यावेळी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार व संचालक प्रसाद लाड, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, राज्य सहकारी संघाचे सचिव रामदास मोरे, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले, नितीन बनकर, विष्णू घुमरे, पुरुषोत्तम दळवी, संदीप घनदाट, अनिल गजरे, जिजाबा पवार, संचालिका जयश्री पांचाळ, कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, बी.डी.पारले, डॉ. महाजन, भाई सावंत यांसह गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी, सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pravin Darekar Cooperative Housing Societies)
यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, गेल्या २५ वर्षात आम्ही सहकारात काम करायला लागलो. वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून सहकारात कामाला सुरुवात केली. मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबईच्या सहकारात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला. मुंबई बँक, मुंबई हौसिंग फेडरेशन, मुंबई सहकार बोर्ड असो वा राज्य सहकारी संघ असो ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर शब्दावर मान ठेवून लोकांना पाठवलात त्यांनी न्याय देण्याचे काम केल्याचेही आ. दरेकरांनी म्हटले. (Pravin Darekar Cooperative Housing Societies)
 
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, हौसिंग फेडरेशन निवडणुकीनिमित्त स्व. रघुवीर सामंत यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. हौसिंग सहकार चळवळीत रघुवीर सामंत यांचे नाव होते. चोवीस तास हौसिंग सोसायट्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे व्यक्ती होते. परंतु बदलत्या परिस्थितीत लोकांना आणखी दिले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत हे समजून आम्ही कामाची गती घेतली. हौसिंग सेक्टरला याआधी कधीच महत्व दिले गेले नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हौसिंग सेक्टरची क्षमता, प्रश्न समजून घेतले आणि कधी नव्हे एवढे महत्व हौसिंग सेक्टरला देवाभाऊंच्या नेतृत्वात दिले गेले. राज्यात अडीच लाख गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. मुंबईत ४० ते ५० हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्था फेडरेशन, मुंबई बँकेच्या सभासदस्यत्वापुरत्या नसून त्यांना सतत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. डिम्ड कनव्हेन्ससह अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून विक्रोळी आणि गोरेगाव येथे हौसिंग सेक्टरसाठी मुखमंत्र्यांकडे जागा मागितली होती. आता विक्रोळी येथे हौसिंग सेक्टर सुरु झाले असून सर्व व्यवस्था तेथे आहेत. येणाऱ्या काळात गोरेगाव येथेही हौसिंग सेक्टर सुरु करणार असल्याचे आ.दरेकर म्हणाले. (Pravin Darekar Cooperative Housing Societies)
 
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातून चांगला कारभार सुरु आहे. प्रकाश दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच वर्ष अतिशय उत्तम काम केले. एक जागृत फेडरेशन म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मुंबई बँकेच्या माध्यमातून गिरणी कामगार, माथाडी कामगार, पोलीस, शिक्षक, लाडक्या बहिणी अशा अनेक घटकांना पाठबळ देऊन उभे करण्याचा प्रयत्न केला. अनेक क्रांतिकारी योजना आणल्या. स्वयं पुनर्विकास योजना आणली. या योजनेसाठी मुंबई बँकेने कर्ज धोरण तयार केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली कि सवलती द्या. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. शासनाच्या सवलती मिळाल्या, जीआर निघाले आणि आज स्वयं पुनर्विकास योजना मुंबईत गतीने आकार घेतेय. १६०० प्रस्ताव आले असून ४६ संस्थांना कर्ज दिले. २१ इमारतीत लोकं राहायला गेली. या योजनेचा एवढा गवगवा झाला कि केंद्राचे पथक ही योजना समजून घेण्यासाठी आणि देशभर राबविण्यासाठी येथे येऊन गेल्याचेही आ. दरेकरांनी म्हटले. (Pravin Darekar Cooperative Housing Societies)
 
आ. दरेकर म्हणाले कि, आता प्रॉपर्टी कार्डवर हौसिंग सोसायटीचे थर्ड पार्टी म्हणून नावं येणार आहे. हा ऐतिहासिक अशाप्रकारचा निर्णय आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. तो आत्मविश्वास घेऊन मुंबईसह राज्याच्या सहकार चळवळीला चांगली दिशा देऊ. मुंबईत सहकारी कार्यकर्त्यांसाठी सायन येथे सहकार भवन उभारत आहोत. दीड वर्षात मुंबईतील सहकार चळवळीचे सहकार भवन उभे राहिलेले दिसेल. सर्व सुविधांनी युक्त हे सहकार भवन असणार आहे, असेही आ. दरेकर म्हणाले.
 
सर्वांच्या सोबतीने हौसिंग चळवळ सशक्त करायचीय
 
आ. दरेकर म्हणाले कि, १०७ वर्षाच्या राज्य सहकारी संघाची अवस्था बकाल झाली होती. मी राज्य सहकारी संघात लक्ष घातले. आज संघ खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करतोय. सहकारात अनेक ठिकाणी चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या सर्वांची शक्ती आणि ऊर्जा सहकारातील कार्यकर्ते आहेत. सर्वांना सोबत घेऊन हौसिंग चळवळ सशक्त करायची आहे. (Pravin Darekar Cooperative Housing Societies)
 
 




संबंधित मजकूर