मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

    23-Oct-2026
 
Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan
 
मुंबई (Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan) : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असतानाच, मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये दि. ३१ ऑक्टोबर आणि २७ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी हल्ले करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील शाळा, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचा उल्लेखही ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, धमकीची सत्यता आणि ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख तपासली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हा ईमेल स्मिथ जॉन्सन नावाच्या व्यक्तीच्या ईमेल आयडीवरून मुंबई महापौर रितू राजेश तावडे आणि उपमाहापौर संजय घाडी यांना करण्यात आला. ई-मेलमध्ये बॉम्बस्फोटासह खालिस्तान समर्थांत गोष्टी लिहील्या आहेत. (Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan)
 
शाळा आणि महापौर कार्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी
 
शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता हा ई-मेल पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यात दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी शाळेवर आणि दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंबईतील तीन ते चार शाळांना लक्ष्य करण्याचा उल्लेखही ई-मेलमध्ये असल्याचे वृत्त आहे. (Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan)
 
हा संदेश महापौर रितू तावडे आणि इतर लोकप्रतिनिधींना उद्देशून पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. ई-मेलमध्ये ‘खलिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा आणि १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा संदर्भ देत 'रक्ताचा बदला रक्त' असा उल्लेख आहे.
 
‘जलसा’ बंगला आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचा उल्लेख
 
ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानावर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला लक्ष्य करण्याचा आणि तेथे बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. (Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan)
 
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेची तपासणी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी महापौर कार्यालय आणि इतर नमूद ठिकाणांबाबत खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan)




संबंधित मजकूर