नाशिक (CA Intermediate Result) :‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’(आयसीएआय)तर्फे सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवार, दि. २२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडक हिने ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवत अखिल भारतीय स्तरावर संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (CA Intermediate Result)
‘आयसीएआय’ने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या परीक्षेत मुंबईचा नील शाह आणि नाशिकची साक्षी चांडक या दोघांनीही प्रत्येकी ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवले असून, त्यांनी अखिल भारतीय स्तरावर संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला आहे. चेन्नईची श्रुती व्ही. हिने ४९२ गुण (८२ टक्के) मिळवत द्वितीय क्रमांक, तर सुरतचा प्रेम अग्रवाल याने ४९० गुण (८१.६७ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. (CA Intermediate Result)
सीए इंटरमिजिएट परीक्षेत ‘ग्रुप १’मध्ये १ लाख ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २३ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी २३.१४ इतकी आहे. ‘ग्रुप २’मध्ये ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी १८.९२ आहे. दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ३८ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी १३.२१ इतकी आहे. या परीक्षेत एकूण १४ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (CA Intermediate Result)