‘जिओ’ची घोडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशी आयपीओ ५.३९ पटीने सबस्क्राईब!; अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस

    23-Oct-2026   

 Jio Platforms IPO
 
मुंबई, : (Jio Platforms IPO)देशातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून गणना झालेल्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ५.३९ पटीने सबस्क्राईब झाला. कंपनीच्या एकूण १९.७५ कोटी शेअर्सच्या तुलनेत एकूण १०६ कोटी शेअर्सची बोली बाजारात लागली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा १२.८७ पट आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा १.५१ टक्के सबस्क्राईब झाला. या आयपीओत अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर आहे.
 
जिओच्या आयपीओद्वारे एकूण ३० हजार २१३ कोटींची गुंतवणूक कंपनीला अपेक्षित होती. मात्र, आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच अँकर बुकमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मार्फत कंपनीने ८११० कोटी जमा केले आहेत. अँकर कोटा पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदार, रिलायन्स आणि जिओचे कर्मचारी तथा विद्यमान समभागधारकांसाठी २२ हजार १०३ कोटींचा इश्यू बाजारात आणण्यात आला आहे. सलग दोन दिवस गुंतवणूकदारांचा ओघ वाढता दिसून येत आहे.(Jio Platforms IPO)
 
पहिल्याच दिवशी २१ ऑक्टोबर रोजी ३.०२ पट आयपीओ सबस्क्राईब झाला. १९.७५ कोटींच्या तुलनेत ५९.६८ कोटी समभागांची मागणी आली. दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या बोलीने पहिल्याच दिवशी आयपीओ ३.०२ पटीने सबस्क्राईब झाला.
 
किती रुपयांनी होणार लिस्टींग?
 
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओची किंमत ग्रे मार्केटमध्ये २३ टक्के म्हणजेच रू. २५८ प्रति समभाग प्रिमिअमवर दाखवत आहे. ज्याचा विचार केल्यास सध्याच्या प्राईस ब्रॅण्डनुसार कंपनीची लिस्टींग १३७७वर असण्याची शक्यता आहे.(Jio Platforms IPO)
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर