नवरात्रीच्या पोस्टवरून धर्मांध मुस्लिमांची दगडफेक; तापीत २५ जणांविरोधात गुन्हा दाखल; ९ जणांना अटक

    22-Oct-2026   

Tapi Stone Pelting Incident
 
मुंबई :  (Tapi Stone Pelting Incident)गुजरातमधील तापी जिल्ह्यात नवरात्रीशी संबंधित इन्स्टाग्राम पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी गुजरातच्या तापी जिल्ह्यातील सोनगड शहरात सुमारे २५ जणांच्या धर्मांध मुस्लिम जमावाने एका व्यक्तीच्या घरावर दगडफेक केली. गौरव चौधरी नामक व्यक्तीने समाजमाध्यमांवर गरब्याशी संबंधित पोस्ट करून आपले मत व्यक्त केले होते. या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या हिंसक घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यामुळे संबंधित घराच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
 
या प्रकरणी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या २५ धर्मांध मुस्लिमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि दंगल घडवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. निझार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर परमार यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.(Tapi Stone Pelting Incident)
 
पोलिसांनी सांगितले की, इन्स्टाग्रामवर नवरात्रीशी संबंधित पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर जमावाने गौरव चौधरी यांच्या घरावर दगडफेक केली. डीएसपी ईश्वर परमार म्हणाले, “तक्रारदाराने समाजमाध्यमांवर आपले मत व्यक्त केले होते. त्याच संदर्भात धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करणाऱ्या सुमारे २५ जणांच्या जमावाने घरावर दगडफेक केली. आम्ही त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दंगल घडवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.” या प्रकरणातील एफआयआर पोलिसांनी ‘संवेदनशील’ म्हणून वर्गीकृत केला आहे. त्यामुळे त्याची माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.(Tapi Stone Pelting Incident)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर