डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश! एमआयडीसी कार्यालयावर रहिवाशांचा धडक मोर्चा

    22-Oct-2026   

Dombivli Water Shortage
 
डोंबिवली : (Dombivli Water Shortage)एमआयडीसी निवासी क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे सलग ३६ तासांच्या पाणी कपातीला विरोध करण्यासाठी आणि पाणी चोरी-गळतीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी परिसरातील अंदाजे १०० रहिवाशांनी स्वयंप्ररणेने एमआयडीसी कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा नेला. कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीत रहिवाशांनी उपअभियंत्यांना घेरून आपल्या तीव्र भावना मांडल्या.
 
एमआयडीसीतील रहिवाशांनी डोंबिवली कार्यालयावर धडक देऊन पाणी खात्याचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपला आक्रोश व्यक्त केला. कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांना या मोर्चा संदर्भात पूर्व कल्पना देऊनही उपअभियंता आलाट हे कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी रहिवाशांनी सलग 36 तास पाणी पुरवठा बंदला सर्वांनी विरोध केला. पाणी गळती आणि चोऱ्या त्वरित थांबवण्यात याव्यात व त्यावर कडक कारवाई करावी इत्यादी मागण्या रहिवाशांनी केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे बबन काळे यानी येणाऱ्या शुक्रवार व शनिवारचा ३६ तास पाणी पुरवठा शट डाउन हा रद्द करावा नाहीतर आम्ही मोठ्या संख्येने पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर धडक मारू व येथेच बसू असा इशारा दिला. संतप्त महिलांनी पाणी पुरवठाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल एमआयडीसीला दोष दिला. अश्विनी भंडारी या महिलेने अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला. जर पाणी पुरवठ्यात योग्य सुधारणा झाली नाही तर पुन्हा आम्ही एमआयडीसी कार्यालयावर धडक मारू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.(Dombivli Water Shortage)
 
या आक्रोश मोर्चाला रहिवाशांच्या बरोबर सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक भालचंद म्हात्रे, बबन काळे, संजय चव्हाण, राजू नलावडे, अजय घोरपडे ,अश्विनी भंडारी, आनंद पाटणे, दीपक भानुशाली, किशोर पेटकर, विलास बोरोले यासह अन्य रहिवाशांनी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना जाब विचारला.(Dombivli Water Shortage)
 




संबंधित मजकूर