‘गोमांतक शुद्धीचा इतिहास’च्या कोंकणी अनुवादाचे २५ ऑक्टोबर रोजी पणजीत प्रकाशन

    22-Oct-2026   

 Gomantak Shuddhicha Itihas Konkani Translation
 
मुंबई : (Gomantak Shuddhicha Itihas Konkani Translation)पोर्तुगीज राजवटीतील गोव्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारा झालेल्या ख्रिस्तीकरणाला उत्तर देत १९२७–२८ मध्ये गोव्यात धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार लोकांची घरवापसी झाली. या चळवळीची माहिती देणाऱ्या 'गोमांतक शुद्धीचा इतिहास' या ऐतिहासिक ग्रंथाच्या कोंकणी अनुवादाचे प्रकाशन गोव्यात होत आहे. रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होणार आहे.
 
शंकर धोंडो क्षीरसागर हे या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत. २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या मूळ मराठी पुस्तकाचा कोंकणी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार (२०२३) प्राप्त सुनेत्रा जोग यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केला आहे. गोव्याच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे दस्तऐवजीकरण यात करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे.(Gomantak Shuddhicha Itihas Konkani Translation)
 
पणजी येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सभापती गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मधु घोडकीरेकर, पुस्तकाच्या अनुवादिका सुनेत्रा जोग आणि सामाजिक कार्यकर्ते देवराज गावडे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.(Gomantak Shuddhicha Itihas Konkani Translation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर