यानिव रेवाच यांनी घेतली सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट

    21-Oct-2026   

Yaniv Revach Meets Mohan Bhagwat
 
मुंबई (Yaniv Revach Meets Mohan Bhagwat) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या १०१ व्या विजयादशमी सोहळ्यात इस्रायलचे मध्य-पश्चिम भारतासाठीचे वाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली. ही भेट दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि सामरिक संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर हे देखील उपस्थित होते.
 
या सदिच्छा भेटीदरम्यान भारत आणि इस्रायल या दोन बंधुभाव असलेल्या राष्ट्रांमधील दृढ व सौहार्दपूर्ण संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील संस्थात्मक स्तर अधिक मजबूत करणे, तसेच भारत व इस्रायलमधील नागरिकांमधील परस्पर संवाद आणि लोकसंपर्क वाढविण्याच्या गरजेवर यावेळी भर देण्यात आला. प्राचीन संस्कृती असलेल्या या दोन्ही देशांमधील भागीदारीचे आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून यानिव रेवाच यांनी सरसंघचालकांना एक विशेष स्मृतिचिन्ह भेट दिले.(Yaniv Revach Meets Mohan Bhagwat)
 
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना यानिव रेवाच यांनी आपल्या सोशल मीडियावर नमूद केले की, भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांसमोर आज चुकीची माहिती, प्रतिकूल कथने आणि कट्टरतावाद यांसारखी अनेक समान आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी ठामपणे एकत्र उभे राहिले पाहिजे. तसेच, आपापल्या संस्कृती, इतिहास आणि परंपरांशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवून आपली खरी बाजू व कथा जगासमोर आपणच प्रभावीपणे मांडली पाहिजे.(Yaniv Revach Meets Mohan Bhagwat)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर