मुंबई : (Union Bank Q2 Results)सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा वार्षिक आधारावर ३०.३१ टक्क्यांनी वाढून ₹५,५३७.२० कोटींवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत बँकेने ₹४,२४९.०८ कोटींचा नफा नोंदवला होता.
बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ₹३२,८०९.२९ कोटी झाले. मागील वर्षी याच कालावधीत ते ₹३१,१८६.३८ कोटी होते. निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) २०.०९ टक्क्यांची वाढ होऊन ते ₹१०,५८३ कोटींवर पोहोचले. निव्वळ व्याज मार्जिन (NIM) २.८६ टक्के नोंदवले गेले.(Union Bank Q2 Results)
बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाली. सकल अनुत्पादित मालमत्तेचे (GNPA) प्रमाण मागील वर्षातील ३.२९ टक्क्यांवरून घटून २.४२ टक्क्यांवर आले. निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे (NNPA) प्रमाणही ०.५५ टक्क्यांवरून ०.४२ टक्क्यांपर्यंत खाली आले.
दरम्यान, बँकेच्या जागतिक कर्जवाटपात वार्षिक आधारावर १८.५३ टक्क्यांची वाढ होऊन ते ₹११.५६ लाख कोटींवर पोहोचले. एकूण ठेवी ६.८७ टक्क्यांनी वाढून ₹१३.१९ लाख कोटी झाल्या. नफ्यातील वाढ आणि अनुत्पादित कर्जांचे घटते प्रमाण यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते.(Union Bank Q2 Results)