जिओ धन धना धन! पहिल्याच दिवशी तिप्पट बोली!

    21-Oct-2026   

Jio Platforms IPO
 
मुंबई, : (Jio Platforms IPO)‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिडेट’च्या आयपीओच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला. देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी ६७ हजार कोटींची म्हणजेच तिप्पट बोली लावली आहे. दरम्यान हा आयपीओ सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहणार आहे. कंपनीने एकूण ३० हजार १८८ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी २७ कोटी नवे समभाग वितरीत केले आहेत. यापूर्वी जिओला बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना ७.२४ कोटींच्या विक्रीत एकूण ८,११० कोटी मिळाले आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी जिओला १९ कोटी ७५ लाख, २५ हजार ९३४ शेअर्सच्या तुलनेत एकूण ६० कोटी, १० लाख २१ हजार ८६० इतके अर्ज आले आहेत.(Jio Platforms IPO)
 
बड्या गुंतवणूकदारांनी नऊ पट आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सध्याच्या आकडेवारीनुसार ०.७१ पट सबस्क्राईब केले आहे. एकूणच हा आयपीओ सरासरी तिप्पट सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटच्या किंमतीत २३ टक्क्यांची वाढ दाखवत आहे. ज्या आधारे भांडवली बाजार एकूण १०.३० लाख कोटींपर्यंत पोहोचू शकते.(Jio Platforms IPO)
 
एका लॉटसाठी १३,४२८ रुपये
 
जिओ प्लॅटफॉर्म्सने एका समभागाची किंमत रु. १,०६५ ते रु. १,११९ अशी निश्चित केली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना किमान १२ समभागांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च किंमत ₹१,११९ धरल्यास एका लॉटसाठी ₹१३,४२८ गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदारांना उपलब्ध मर्यादेनुसार जास्तीत जास्त १४ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो.(Jio Platforms IPO)
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर